करमाळ्यातील युवकाचा बारामतीत खून ; नामांकित महाविद्यालयातील घटना
करमाळा –
बारामती येथील नामांकित महाविद्यालयामध्ये करमाळा तालुक्यातील जेऊर येथील युवकाची धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. याप्रकरणी एकाच ताब्यात घेतले आहे तर एक पळून गेल्याची माहिती आहे.

बारामती येथील टीसी महाविद्यालयात करमाळा तालुक्यातील जेऊर येथील ओंकार पोळ हा बारावीत शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्याचे संबंधित मुलांसोबत वादही झाला होता. त्या वादाचे रूपांतर खुनात झाल्याचे दिसून आले आहे. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बारामती पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत.

शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी राहत असताना अशा पद्धतीने युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडल्यामुळे करमाळा तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर जेऊरसह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.