E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

‘सैराट’ फेम कलाकाराला फसवणुक प्रकरणी अटकेची शक्यता

समाचार टीम

सैराट (sairat )फेम अभिनेत्याचे नाव एका फसवणुकीचा प्रकारात समोर आले असल्याने त्याच्यावर आता अटकेची टांगती तलवार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलीय.

याप्रकरणी दत्तात्रय क्षिरसागर ( रा. नाशिक ), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे ( दोघेही राहणार संगमनेर ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर यांची चौकशी करताना सुरजचे नाव समोर आले आहे. सुरज (suraj pawar) यात आहे का नाही हा तपासाचा भाग असला तरी त्याला अटक केली जाण्याची शक्यता आहे.

अटकेतील आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहीतीनुसार, या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग आहे. या प्रकरणी महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये  संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाख रूपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी  नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सुरज पवार याला देखील अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE