जुन्या भांडणाच्या रागातुन शेलगाव (वां) येथे एकाचा खुन ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
जुन्या वादातुन शेलगाव ता. करमाळा येथील एकाचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले व संपुर्ण तपासाला सुरुवात केली दरम्यान फिर्यादीच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतिक उर्फ गद्या काळ्या भोसले हा मयत झाला आहे. तर ६ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या प्रकरणात मयत असलेल्या व्यक्तीच्या सावत्र भावासह मित्रांचा यात सहभाग असल्याची तक्रार घरच्यांनी नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीप्रमाणे सदरची घटना काल दुपारी घडले आहे.

शेलगाव वांगी येथे दि 02/08/2024 रोजी दुपारी 02:00 वा ते 02:30 वा चे सुमारास जुन्या भांडणाचे कारणावरून सहा लोकांनी एकत्रीत येवुन शेतीचे व जुना भांडणाचे कारणावरून मयत मुलास डोकीत, पोटावर, गालावर, कानावर धारदार हत्याराने मारून गंभीर जखमी करून जिवे ठार मारले आहे. म्हणुन त्यांचे विरूध्द फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल केला आहे.