BREAKING NEWS – अनैतिक संबधातुन आष्टीच्या एकाचा करमाळ्यात खुन ; पत्नी व प्रियकरास अटक
करमाळा समाचार –
करमाळा तालुक्यातील जामखेड रोड वरील हॉटेल हिंदवी शेजारी एका अनोळखी इसमाचे मयत शरीर मिळुन आल्यानंतर पोलिसांनी वेगवान तपास केला दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणात नव्याऱ्याची अडचसर होत असल्याने त्याला सापवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावरुन मयत अनिल मोरे याची पत्नी संगिता व प्रियकर अभिजीत उर्फ अंकित बुचुडे रा. आष्टी ता. बीड याला अटक केली आहे.

दिनांक ११ रोजी करमाळा येथे आपल्या खाजगी कामासाठी आष्टी तालुक्यातून अनिल मोरे हे आले होते. तर त्याच दिवशी मध्यरात्री जामखेड रोड येथील एका हॉटेल वर संशयित आरोपी व मोरे हे दोघे जेवणासाठी गेले होते. त्यानंतर रात्री 12 ते 12 : 30 दरम्यान लघु शंकेचा बहाना करून संशयित आरोपी बुचुडे यांनी मोरे यास बाहेर घेऊन गेला व तेथेच त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला व प्रसार झाला त्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी घटनास्थळाला भेट देत अनिल निंबाळकर यांच्याकडे तपास सोपवला व त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निंबाळकर, मनिष पवार, सुरज तनपुरे व सोमनाथ जगताप यांच्या पथकाने वेगवान तपास करीत मयताची ओळख पटवुन त्याची माहीती घेतली. त्यावेळी नवीन नवीन खुलासे होत गेले. त्यातुन मुख्य त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दोघांनी प्रेम संबधातुन मयताचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मिस कॉल वरुन तपास ..
सदरच्या प्रकरणात संशयीत आरोपी व मयत हे जेवायला गेले त्यावेळी जेवण झाल्यानंतर हॉटेल मालकाला स्वतःच्या मोबाईल वरून मिस कॉल दिला होता. तो नंबर पोलिसांच्या हाती लागला त्यावरुन तपासाला गती आली व अनोळखी मयताची ओळख पटवत प्रकरणाचा खुलासा झाला.