करमाळासोलापूर जिल्हा

सोने दुकानाबाहेर परस्पर सोने खरेदी पडली महागात ; करमाळ्यात घडलेल्या प्रकाराची संपुर्ण माहीती

करमाळा समाचार

सोने दुकाना बाहेर सोन्याचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या एका फायनान्स कर्मचाऱ्याला भलतेच महागात पडल्याचे दिसून येत आहे. कमी किमतीतील सोनी विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रताप महादेव दडस वय-21 वर्षे ,धंदा- नोकरी रा -उंबरेदहिगांव ता माऴशिरस जि सोलापुर असे तक्रारदाराचे नाव आहे.

politics

तक्रारदार हे स्वतंत्र फायनान्स करमाऴा मध्ये 9 महिन्यापुर्वी वसुली आँफिसर म्हणून काम करत होते. आत्ता सध्या मधुरा फायनान्समध्ये लोणंद जि सातारा मध्ये काम करत आहेत. करमाळ्यात काम करीत असताना करमाळ्यातील आक्काबाई यादव काळे यांचे घरी कर्जाचे हप्त्यांची वसुली करण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांची व त्यांचे पती यादव काळे व जावई मंहेद्र पवार यांची त्यांचे घरी माझे सतत जाणे येणे असल्यामुळे ओळख झाली होती.

जानेवारी मध्ये मी माझे फायनान्स वसुली करिता आक्काबाई यादव काळे हिचे घरीगेल्यानंतर .त्यावेऴी आक्काबाई यादव काळे हिने मला तुझे लग्न झाले आहे का, तु लग्न करणार आहे का असे विचारले त्यावेऴी मी तिला माझे लग्न करायचे आहे .असे म्हणालो असता मला आक्काबाई काळे हिने आमचेकडे पावती असलेले सोने आहे असे सांगितले ते सोने लग्नासाठी घेतो का असे म्हणाली त्यावेऴी दडस यांनी तिला लग्नाच्या वेऴी बघु असे म्हणाले. त्यानंतर दिनांक 05/10/2020 रोजी 07/30 वा मला आक्काबाई यादव काऴे हिचा फोन आला व तिने सोने बघायला या व येताना अँडव्हान्स घेवुन या असे म्हणाली असता मी लगेचच लोणंद वरून करमाऴा येथे देविचा माऴ येथे दुपारी 1/00 वा आले. त्यावेऴी मला आक्काबाई काळे हिने दिड ग्रँम सोन्याची रिंग दिली व 21000 रुपये अँडव्हन्स घेतला व पाच तोळे सोने तुला पाहिजे असेल तर दिड लाख रुपये तुला द्यावे लागतील असे म्हणाली.

पुढील घटना कशी घडली असे दडस यांनी तक्रारीत सांगितले आहे, दि 21/10/2020 रोजीदुपारी 12/30वा.चे सुमारास लोणंद वरून भिगवण रोडने करमाऴा येत असताना 01/30 वा.चे सुमारास आक्काबाई यादव काळे हिचा फोन आला व तिने तुम्ही कुठे आहेत तुम्ही करमाऴा येणार आहेत की नाही असे म्हणाली असता मी त्यांना भिगवणचे पुढे सोने घेणेसाठी आलो आहे व 05/30 वाचे पर्यत करमाऴा येथे येतो असे सांगितले त्यावेऴी त्यांनी मला तुम्ही करमाऴ्यात येवुन नका विटच्या माऴावर या असे सांगितले त्यावेऴी मी माझे मोटार सायकल वर विट माऴावर गेलो त्याठिकाणी माझे ओळखीचे आक्काबाई यादव काळे ,त्यांचे पती यादव काळे व त्याच्या बरोबर त्याचा जावाई मंहेद्र पवार असे व अनोऴखी पुरूष अंदाजे 25 ते 30 वय असलेला पुरुष असे चारजण होते . त्यावेऴी त्यातील आक्काबाई काळे हिचा जावाई मंहेद्र पवार याने तु पैसे आणले आहेत का असे विचारले त्यावेऴी मी त्याना पैसे आणले आहेत असे म्हणाला असता मंहेद्र पवार यांनी चाकु दाखवला व तुझ्याकडे असलेले पैसे मला दे नाहीतर तुला चाकुने भोकसुन मारून टाकिन असे म्हणाला.

त्यावेऴी मी त्यांना 5 तोळे सोने द्या असे म्हणालो असता.यादव काळे व अनोळखी इसमाने मला हा कसले सोने तु आम्हाला आणलेले पैसे पहिले दे असे म्हणून हाताने लाथाबुक्याने मारहाण करीत असताना मंहेद्र पवार याने माझ्या हातात असलेली पिशवीतील 106000 रुपये रोख रक्कम तसेच माझ्या खिशातील माझे नावचे ड्रायव्हींग लायसन्स मारहाण करून काढुन घेतली आहे व आक्काबाई यादव काळे हिने तु आम्ही तुझ्याकडील पैसे मारहाण करून काढुन घेतलेबाबत कोणाला लोकांना व पोलिंसांना सांगितले तर तुझी खैर नाही अशी दमदाटी केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE