करमाळासोलापूर जिल्हा

आदिनाथ कारखाना सहकारी आहे व सहकारीच रहावा : मानसिंग खंडागळे

करमाळा समाचार

सभासद हेच मालक कायम रहावेत. लवकरच होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत सभासद ज्या नवीन संचालक मंडळाला निवडून देतील त्यांच्याच मार्फत कारखाना चालवला जावा व कुठल्याही परिस्थितीत कोनत्याही खासगी मालकाच्या हातात करमाळा तालुक्यातील तमाम उस उत्पादक शेतकर्यांचे विश्वासाचे व आस्थेचे प्रतिक असणार्या आदिनाथ कारखाना देउ नये.

सभासदांचा विश्वासघात करून कोनाच्या घशात घालण्याचा प्रयत्न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल व विरोध नोंदवण्यात येईल असे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नारायण खंडागळे यांचे चिरंजीव व गुळसडी गावचे माजी सरपंच मानसिंग खंडागळे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE