नागोबांच्या गावात नागराज शिरले गाडीच्या खोपडीत ; थरकाप उडवणारा नागोबा – विडिओ व्हायरल
करमाळा समाचार
काल परवा आपण एक व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये अचानक एक नाग निवांत बसलेल्या व्यक्तीला येऊन जावा घेतो त्या व्यक्तीला क्षणाचाही विलंब न करता दवाखान्यात पोहोचवले त्यामुळे त्याचे प्राण वाचले. विशेष म्हणजे सदरची व्यक्ती ही कसलीही हालचाल करत नसताना त्याला चावा घेतला होता. करमाळा शहरालग्त लगत असलेल्या एका घरा जवळ सदरचा प्रकार घडला होता.

पण करमाळा तालुक्यात असंही एक गाव आहे जिथे घरात नागाचे दर्शन झालं तरी त्यास देव मानून मारले जात नाही किंवा तोही कोणाला त्रास देत नाही. आज असाच नागराज हा एका दुचाकीच्या खोपडीत जाऊन बसला. त्याला शेटफळ च्या पत्रकार गजेंद्र पोळ यांनी बाजूला नेऊन सोडला. त्या निमित्ताने पुन्हा एकदा मागील आठवड्यातला विषय चर्चेत आला. गावकऱ्यांच्या माहितीनुसार त्या गावात कधीच नागांना किंवा सरपंना मारले जात नाही. त्या ठिकाणी पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी तर प्रत्येक घरात त्यांच्या बसण्याची सोयही केली जात असे. आता घरे बदलली त्यामुळे या सोय होत नाहीत. पण तरीही गावात कुठेतरी दिसले तरी एका मंदिराजवळ येऊन त्यांना सोडले जाते.

सदरच्या गावाला मुळातच नागोबाची शेटफळ म्हणून ओळख प्राप्त आहे. या गावात दरवर्षी नागपंचमीला मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. परिसरातून महिला तसेच भक्त या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. आणि आवर्जून त्या दिवशी नागराज ही दर्शन देतात हे या गावचे वैशिष्ट्य आहे. आज दुपारी असाच एका दुचाकी मध्ये नागराज जाऊन बसले. त्यांना अलगद काठीच्या सहाय्याने पत्रकार गजेंद्र पोळ यांनी बाजूला करून योग्य त्या ठिकाणी नेऊन सोडले. नागराजांनीही सुरुवातीला नकार दिला होता. पण काही वेळाने त्यांनीही काठीचा आधार घेत पोळ यांच्या सोबत जाणं पसंत केलं.