करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आंतरराष्ट्रीय योग दिन जिंतीत होणार ; महाराष्ट्रातील दोन आयुष्यग्राम मध्ये जिंतीची निवड

जिंती प्रतिनिधी – दिलीप दंगाने

महाराष्ट्र शासन -सार्वजनिक आरोग्य विभाग , राष्ट्रीय आयुष अभियान, आरोग्य विभाग -जिल्हा परिषद सोलापूर.
21 जुन हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्व जगामध्ये साजरा केला जातो. ह्या वर्षी महाराष्ट्रातुन दोन आयुष ग्रामची निवड आंतरराष्ट्रीय योग दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी झाली आहे. त्यापैकी आयुषग्राम जिंती तथा शासकीय आयुर्वेद दवाखाना जिंती ता करमाळा जि सोलापूर ची निवड करण्यात आली आहे.1000 लोकांना एकत्रित योग करण्याची व्यवस्था झाली आहे.

जो बहुमान जिंती ला मिळाला आहे त्याचे सोनं करण्यासाठी , स्वतः च्या व कुटुंबाच्या आरोग्यासाठी , योगशास्त्र माहिती व योग प्रात्यक्षिके करण्यासाठी जिंती व पंचक्रोशीतील सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे .

योगाचे महत्त्व
१. उत्तम शारीरिक आरोग्य
२.उत्तम मानसिक आरोग्य
३ असंसगिक रोगांपासून संरक्षण जसे बीपी. ब्लड शुगर. लठ्ठ पणा इत्यादी
कार्यक्रम स्थळ -श्री एस यु राजेभोसले हायस्कूल जिंती
वेळ -सकाळी ६.३० ते ८.३०
टिप येताना रिकाम्या पोटी यावे.
सदरचा कार्यक्रम केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या नियमानुसार असल्याने सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे.

महाराष्ट्रातुन जिंतीची निवड होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डि. के. पाटील जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रध्दा भोंडवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत येवगे यांनी परिश्रम घेतले व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सरचा कार्यक्रम भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE