करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

स्वतःच्या व्यावसायिक दूश्मनीसाठी ॲट्राॅसिटी चा गैरवापर करणारांची नार्को टेस्ट करा- नागेश कांबळे

 करमाळा समाचार

तालूक्यात सोनाई तसेच नेचर डेअरी च्या प्रमूख यांच्यातील वादात दाखल अॅट्राॅसिटी च्या गून्ह्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच आरोपी व फिर्यादी यांची नार्को टेस्ट व्हावी यात राजकीय लोकांकडून जाणीवपूर्वक अॅट्राॅसिटी चा गैरवापर झाल्याची चर्चा आहे असे रिपाई (आ) चे नागेश कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इंदापूर सोनाई दूध डेअरीचे प्रमूख दशरथ माने तसेच भाजपा तालुकाध्यक्ष तसेच दूध संकलक गणेश चिवटे यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून दूध व्यवसायात संबंध आहेत. १ आॅक्टोबर पासून दूध दरवाढी तसेच संकलनाबाबत स्पर्धेतून वाद झाल्याचे पर्यावसन भांडणात झाले. यासंबंधी सर्व वृतांत विविध वृत्तपत्रांतून देखील आलेला आहे. याच वादातून दोन्ही कडील समर्थकांकरवी माने तसेच चिवटे यांच्यावर अॅट्राॅसिटी चा गून्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणात एका वरिष्ठ मंत्र्याने हस्तक्षेप केल्याची चर्चा चालू आहे.

अॅट्राॅसिटी कलम १८ मधील तरतूदी नूसार आरोपीला अटकपूर्व जामीन भेटत नाही हेच यामागील खरे कारण असून राजकीय लोकांकडूनच या कायद्याचा गैरवापर होत आहे. सदरील प्रकरणामुळे तालूक्यातील जनतेत चीड निर्माण झालेली आहे. कायद्याचा चा गैरवापर करणारी हि किड मूळासकट उपटून काढली जावी. यासाठी सदर प्रकरणातील फिर्यादी व आरोपी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी तसेच याची उच्चस्तरीय चौकशी चौकशी करण्यात यावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन अनुसूचित जाती जमाती आयोग, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE