करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

नवोदय विद्यालय पोखरापूर येथे गुरुकुल पब्लिक स्कूल ची यशाची परंपरा कायम

करमाळा समाचार


दरवर्षी प्रमाणे नवोदय विद्यालय पोखरापूर येथे गुरुकुल पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यांची निवड होतेच त्याप्रमाणेच याही वर्षी गुरुकुल पब्लिक स्कूल मधील विद्यार्थिनी स्वरा ओंभासे या विद्यार्थिनीची नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे.

गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये स्कॉलरशिप नवोदय सैनिकी स्कूल या सर्व परीक्षांची अतिशय उत्तमरीत्या तयारी करून घेतली जाते, त्यासाठी दिवाळीच्या अगोदरच सर्व स्पर्धा परीक्षांचा सिल्याबस पूर्ण करून घेतला जातो व दिवाळीनंतर फक्त विविध प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. त्यासाठी विविध जिल्ह्यातून विविध प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका तसेच प्रश्नसंच मागवून त्यांचा सराव करून घेतल्या जातो. संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतल्या जातात. त्यात चुकलेल्या प्रश्न प्रकारांचा सराव करून घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळेच आजही गुरुकुल पब्लिक स्कूलची नवोदय मधील यशाची परंपरा कायम आहे.

या यशासाठी स्वराला गुरुकुल पब्लिक स्कूल चे संस्थापक माननीय श्री. नितीन भोगे सर सचिवा सौ. रेश्मा भोगे मॅडम, एच.ओ.डी.सौ. सारिका शिंदे मॅडम व शितल पवार मॅडम वर्गशिक्षिका सौ. लता नायकुडे मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE