मकाईत विजयासाठी ‘इतक्या’ मतांची गरज ; एकाच वेळी 20 केंद्राची मतमोजणी
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे बहुउद्देशीय सभागृहात सुरुवात होणार आहे. यावेळी वीस टेबल च्या माध्यमातून एकाच वेळी 20 केंद्राची मतमोजणी होणार आहे असे दोन टप्प्यात मोजणी पूर्ण होईल. एकुण मतदान 9703 झाले आहे. तर उमेदवाराला विजयासाठी 4851 मतांची गरज पडणार आहे.


बागल विरोधी गटाकडून केवळ पाच जागांवर दावा करण्यात आला असला तरी नऊ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यामधून चार जागी बागल गटाचा उमेदवार निर्विवाद विजयी होणार आहे. तर यापूर्वी आठ उमेदवार अविरोध निवडणूक जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संपूर्ण सभासदांच्या मतदानावर सर्वच्या सर्व गटातील उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असल्याने झालेल्या मतदानापैकी सर्वोच्च मते ज्या उमेदवाराला मिळतील तो उमेदवार विजयी होणार आहे. तर भिलारवाडी गटातून दोन जागांसाठी चार उमेदवार मैदानात आहेत. तर पारेवाडी गटातून तीन जागांसाठी ही चार उमेदवार मैदानात आहेत. मांगी गटातून दोन जागांसाठी तीन उमेदवार तर महिला राखीव प्रतिनिधी म्हणून दोन जागांसाठी तीन उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे भिलारवाडी वगळता सर्वत्र गटात एकाच जागेवर विरोधी गटाचे आव्हान असणार आहे.
निवडणुक लागलेले गटनिहाय उमेदवार:-
भिलारवाडी – रामचंद्र हाके, अजित झांजुर्णे , सुनिता गिरंजे, आप्पासाहेब जाधव, पारेवाडी : उत्तम पांढरे, रेवन्नाथ निकत, संतोष पाटील, गणेश चौधरी, मांगी- दिनेश भांडवलकर, अमोल यादव, सुभाष शिंदे, महिला राखीव प्रतिनिधी- कोमल करगळ, अश्विनी झोळ, सुनिता गिरंजे
अविरोध गटनिहाय उमेदवार:-
चिखलठाण – सतीश नीळ, दिनकर सरडे, वांगी- सचिन पिसाळ, युवराज रोकडे, उस उत्पादक व बिगर उस उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी- नवनाथ बागल , भटक्या जाती जमाती- बापु चोरमले, इतर मागास- अनिल अनारसे, अनुसूचित जाती जमाती: अशिष गायकवाड .