E-Paperताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

महाविकास आघाडीतील तर दुरच करमाळ्यात राष्ट्रवादीतील धुसफुस चव्हाट्यावर

करमाळा समाचार


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी मुंबईत एका सभागृहात वाढदिवसानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करमाळ्यात दत्त पेठ येथील दत्त मंदिरात करण्यात आले होते आहे तर तेथूनच 100 फुटाच्या अंतरावर भर चौकातच दुसऱ्या गटानेही अभिष्टचिंतन सोहळासाठी थेट प्रक्षेपण करून तालुक्यातल्या राष्ट्रवादीतली धुसपुस चव्हाट्यावर आणली आहे.

सदर कार्यक्रमासाठी नेमक्या परवानग्या काढल्या आहेत का हाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. भर चौकात या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. तर यासाठी परवानग्या नेमक्या दिल्या. पक्षाच्या वतीने ही कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की बंद हॉलमध्ये जिथे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात असेल अशा ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करावे. पण तसे होताना दिसत नाही.

कार्यकर्त्यांना हा सोहळा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी थांबून पाहण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशा सूचना असतानाही दुसऱ्या गटाने थेट शहरातील मुख्य चौकातच एक छोटा मंडप उभा करून थेट प्रक्षेपणाची सोय केली आहे. पण त्यामुळे वाहतुकीला तर अडथळा निर्माण झालाच आहे शिवाय थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आलेल्या लोकांना भर उन्हात बसावे लागत आहे. त्यामुळे एका ठिकाणी कार्यक्रम असताना दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास कोणी आणि कशासाठी केला हा प्रश्न निर्माण होत आहे.

 

प्रतिक्रिया

यासंदर्भात राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी या वृत्ताचे खंडन करीत दत्तपेठ व राशीन पेठ येथील वेगवेगळे कार्यक्रम होते तर चौकात पेढे वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामुळे धुसफुस वैगरे काही नाही असे जाहीर केले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE