आदमापुर ग्रामपंचायतीने केली नवी मागणी ; अन्यथा धनगर समाज जनआंदोलन उभा करेल
करमाळा समाचार
उंदरगाव येथील मनोहर मामा भोसले यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता आदमापुर येथील ग्रामपंचायतीने नवीन मागणी करत बाळूमामा मालिकेतील सुरुवातीला लावण्यात आलेला मनोहर भोसले यांचा फोटो हटवण्यात यावा अशी मागणी केली आहे अन्यथा धनगर समाज व बाळूमामा भक्त मालिका बंद करण्यासाठी जन आंदोलन उभा करेल असा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे.


नुकतेच उंदरगाव येथील मनोहर भोसले यांनी एक पत्रकार परिषद घेत आपण बाळूमामा यांचे वंशज नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर लगेचच कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील ग्रामपंचायतीने नवीन मागणी केली आहे. यावेळी संतोष आयाचीत (निर्माता साजरी क्रिएटिव्ह प्रोडक्शन हाऊस मुंबई) यांना ग्रामपंचायतीने पत्र लिहित सदरच्या मालिकेच्या पुर्वी येणारा मनोहर भोसले यांचा फोटो पाठवण्यात यावा अशी मागणी केली आहे.
तसेच मनोहर भोसले यांचा फोटो न हटवल्यास नाईलाजास्तव श्री बाळूमामा भक्तांच्या आणि धनगर समाजाच्या वाढत्या दबावामुळे आम्हाला मालिकाच बंद करण्यासाठी जनआंदोलन व कायदेशीर लढाई सुरू करावी लागेल असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.