करमाळ्यासह पाच तालुक्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन आदेश ; उद्या पासुन नवे नियम
करमाळा समाचार
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नवे आदेश काढले असून दिनांक 23 पासून दुपारी चार वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्याचे आदेश यावेळी शंभरकर यांच्या वतीने देण्यात आले आहेत. यासंबंधीचा आदेश रविवारी काढण्यात आला आहे.


कोरोना रुग्णसंख्या वाढत चालल्याच्या अनुषंगाने माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला व पंढरपूर या भागात दिनांक 23 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना कडक निर्बंध लागू केले होते. परंतु आता जिल्हाधिकारी यांनी नियम शिथिल केले असून माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला, पंढरपूर या ठिकाणची दुकानांची वेळ चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.