पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणेकामी विभागिय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन
समाचार – दिलीप दंगाणे
मध्य रेल्वेचे पारेवाडी रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे कामी येथील ग्रामस्थ सन 1996 पासून प्रयत्न करीत आहेत परंतु अद्याप या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळालेला नाही. या करिता येथील प्रवासी संघटना व ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही ही मागणी पूर्ण झालेली नाही या ठिकाणी सन १९९६ मध्ये रेल्वे रोको आंदोलन देखील झालेले होते.

सध्या मध्य रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आलेले असून या स्टेशन व परिसरातील गावांचा विचार करता या ठिकाणी एक्सप्रेस गाडीला थांबा देणे अतिशय गरजेचे असले बाबत विभागीय रेल्वे स्थापकाना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे सदरचे निवेदन माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांना देण्यात आलेले असून याबाबतची माहिती माजी सरपंच एडवोकेट अजित विघ्ने, ग्रा.पं. सदस्य महादेव नगरे यांनी दिली.