करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याहस्ते ड्रोनचे उद्घाटन ; जमीनींच्या मोजणी साठी ड्रोनचा वापर होणार

प्रतिनिधी

ड्रोन सर्वेक्षणाद्वारे नागरिकांना गावठाणांची अचूक माहिती मिळणार आहे यामुळे अनेक गावातील तंटे वाद मिटवून जमीन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाचा फायदा होणार असल्याचे मत करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केले. ड्रोन सर्वेक्षणामुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे अत्याधुनिक पद्धतीने सर्वे होऊन प्रत्येक घराचा नकाशा, सीमा, क्षेत्र यांची अचूक माहिती मिळणार आहे. कर्ज उपलब्धता, विविध आवास योजनेस मंजुरीसाठी ,जागेचे मालकी हक्क दाखवण्यासाठी, मालमत्तेचा अधिकार पुरावा मिळकत पत्रिका स्वरूपात मिळण्यासाठी या सर्वेक्षणाचा फायदा होणार आहे.

करमाळा तालुक्यातील सर्व गावातील जमिनींचे सर्वेक्षण आता ड्रोन द्वारे होणार असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक श्री प्रकाश कांबळे यांनी दिली. आज 26 ऑगस्ट रोजी या योजनेचा शुभारंभ करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. देवीचा माळ नंतर उर्वरित सर्वच गावांचे मोजमाप ड्रोनद्वारे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी उपस्थित तहसीलदार समीर जी माने साहेब, गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब, भूमी अभिलेख वर्गाचा सर्व स्टाफ, मोटे मॅडम, कांबळे साहेब, ड्रोन कॅमेरा मन आनंद सागर ,उद्धव दादा माळी कंदर चे अमोल दादा भांगे, सरपंच महेश सोरटे उपसरपंच दीपक थोरबोले ग्राम पंचायत सदस्य संतोष पवार, अमोल चव्हाण, सचिन शिंदे, देवीचा माळ तंटामुक्त अध्यक्ष सचिन शेठ चोरमुले, भाऊसाहेब जाधव साहेब ,ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच श्रीराम फलफले, माजी सरपंच दादासाहेब पुजारी, माजी उपसरपंच नवनाथ दादा सोरटे, प्रमोद गायकवाड, राजेंद्र सूर्यपुजारी, राजेंद्र पवार, सचिन चव्हाण, शेखर पवार, अक्षय सोरटे, लक्ष्मण हवलदार, कमला भवानी ट्रस्टचे विश्वस्त विवेक अण्णा येवले, पत्रकार जयंत दळवी व श्रीदेवीचा माळ पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE