आता रेमडीसिवर माहीती रोजच्या रोज प्रसिद्ध होणार ; मनसेच्या मागणीला यश
करमाळा समाचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना,करमाळा तालुका अध्यक्ष मा.संजय (बापु) घोलप यांनी करमाळा तहसीलदार साहेबांना रेडमिसेवर इंजेक्शन संदर्भात 20/4/2021 रोजी प्रत्रा द्वारे मागणी केली होती कि करमाळा तालुक्याला रोज किती रेडमिसेवर इंजेक्शन येतात आणि करमाळा तालुक्यातील व शहरातील कोणत्या कोव्हिड हाॅस्पिटल ला किती कोणाला देतात याची करमाळा तालुक्यातील नागरिकांना कळण्यासाठी माहिती पत्रकार बंधुना प्रसिद्ध करावी.

त्या मागणीला यश आले असुन आज पासुन मा.तहसीलदार यांनी तत्काळ मागणीचा विचार करून निर्णय घेतला व मेडिकल ऑफिसर मा.गायकवाड साहेब यांनी पण फोन द्वारा मा.संजय (बापु )घोलप यांना सांगितले कि उद्या पासुन रेडमिसेवर इंजेक्शन ची पुर्ण माहिती प्रसिद्ध करू तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, करमाळा तालुका व शहरच्या वतीने च्या वतीने मा तहसीलदार माने साहेब व गायकवाड साहेब यांचे आभार व्यक्त केले. पत्रकार बंधुना मा.गायकवाड साहेब यांना संपर्क साधून रोजच्या रोज रेडमिसेवर इंजेक्शन ची माहिती नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी हि विनंती केली आहे.
