हरकती घेतल्याने तीन गणातील गावात झाला बदल ; आता जेऊरवाडी असेल “या” गणात
प्रतिनिधी | करमाळा
तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटातील प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्यावर हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या हरकती व सुनावणी होऊन तालुक्यातील तीन गावांचा बदल करण्यात आला आहे. सदरच्या हरकती विभागीय आयुक्त पुणे यांनी दखल घेऊन सदर बदल केला आहे. तालुक्यातून केवळ आठ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी तीन बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये जेऊरवाडी गावाचा समावेश आहे.


तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणासाठी निवडणुका होणार आहेत. यासाठी तालुक्यातील नवीन दोन गण व एक गट वाढल्याने आता गावांची मर्यादित संख्या ही गट व गणात असणार आहे. त्यामुळे चुरशीचे निवड्णुक होईल यात शंका नाही. यासाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी हरकती मागवण्यात आल्या होत्या. दोन जुन रोजी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेची हरकती ना वेळ दिला होता. २७ तारखेला जाहीर करण्यात आले आहेत.
सुरुवातीला झालेल्या प्रभाग रचनेमध्ये दिलमेश्वर/ वडाचीवाडी या गावाला फिसरे गणात घेण्यात आले होते. त्यावर आक्षेप घेतल्यामुळे आता ते गाव पांडे गणात सामाविष्ट केले आहे. तर जेऊरवाडी हे गाव उमरड गणात घेण्यात आले होते. तर त्यावर आक्षेप घेतल्यामुळे सदरचे गावे जेऊर गणात घेण्यात आले आहे. तसेच बिटरगाव श्री हे रायगाव गणात घेण्यात आले होते. त्यावर हरकत घेतल्याने आता ते गाव पांडे जाणार जोडण्यात आले आहे.