करमाळासोलापूर जिल्हा

राजुरी येथील उपक्रम राज्याला प्रेरणादायी– गटविकास अधिकारी मनोज राऊत

करमाळा समाचार -संजय साखरे

राजुरी तालुका करमाळा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश दिगंबर जाधव यांनी राबविलेला हा उपक्रम संपूर्ण करमाळा तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्र राज्याला दिशा देणारा व प्रेरणादायी आहे. असे गौरवोद्गार करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी काढले.

आज राजुरी तालुका करमाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी स्वखर्चातून राजुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या सुमारे 170 विद्यार्थ्यांना प्रत्येकी सातशे रुपये किमतीचे शालेय साहित्य मोफत वाटप केले. याचा शुभारंभ गटविकास अधिकारी राऊत व बारामती ऍग्रो ग्रुपचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी गटविकास अधिकारी बोलत होते.

यावेळी राऊत पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्र राज्यात 65 हजार सरकारी शाळा असून त्यामध्ये 55 लाख मुले शिक्षण घेत आहेत. यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून त्यांनी अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना च्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक हेळसांड आता शिक्षकांनी भरून काढावी असे आवाहन त्यांनी केले.

यापुढील काळात करमा ळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी लिहिता वाचता न येणारा विद्यार्थी दाखवा व एक हजार रुपये मिळवा असा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांचे भाषण झाले.

यावेळी व्यासपीठावर कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील, युवक नेते तानाजी बापू झोळ, रामदास धंगेकर, अध्यक्ष गणेश जाधव, सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, आर आर साखरे, राजेंद्र साखरे, दत्तात्रय बोबडे, लालासाहेब भोईटे, नंदकुमार जगताप, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष शितोळे यांनी केले तर आभार सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE