रिटेवाडी करांच्या भेटीला अधिकारी ; उपोषण चिघळले (विडिओ उपलब्ध)
करमाळा समाचार
कार्यकारी अभियंता पुर्नवसन सोलापूर मा.वाडकर, सहाय्यक उपअभियंता राठोड साहेब यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यांनी दिलेल्या पोकळ आश्वासन ग्रामस्थांनी फेटाळून लावली. उपोषण पुढे चालूच ठेवले आहे. तर लवकरच यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरु आहे.

https://youtu.be/PxYb2_26yaQ

सभापती ननवरे साहेब, रिपाईचे नागेश कांबळे, जि प सदस्य आवटे, प्रहार संघटनेचे अनारसे मॅडम, तात्यासाहेब सरडे , पं स सदस्य अतुल पाटील, उपसभापती सरडे साहेब, नेते पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष सतोंष वारे, तानाजी झोळ, उमरड चे सरपंच संदीप पाटील करमाळा व परिसरातील संघटनानी भेट देऊन पाठींबा दिला.
काही उपोषणकर्त्यांची प्रकृती ठासाळली आहे. तरी कोणत्याच वैद्यकीय अधिकारी व प्रशासन यांनी लक्ष दिलेले नाही.
तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिवसभर शहरात असून देखील ही त्यांनी उपोषणस्थळी भेट देण्याचे टाळले. तसेच कोणत्याच माजी आमदारांनाही देखील रिटेवाडी चे उपोषण स्थळी भेट देणे म्हत्वाचे वाटले नाही.