आध्यात्मिकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

ईदच्या निमित्ताने कुंभेज मधे दिला जातोय एकात्मतेचा संदेश – दिग्विजय बागल

कुंभेज –

कुंभेज येथील ज्योतिर्लिंग मंदिरात आयोजित शिरखुर्मा मेजवानी प्रसंगी अनौपचारिक संवाद साधताना दिग्विजय बागल म्हणाले की स्व. लोकनेते दिगंबरराव बागल हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री असताना वंचित व अल्पसंख्यांकांचे प्रश्न सोडवण्यास त्यांनी कायम प्राधान्य दिले. हाच समतेचा विचार बागल कुटुंबीय आजही जपत आहे.

कुंभेजच्या पठाण, शेख कुटुंबीयांकडून साजरी केली जाणारी ईद ही आगळी वेगळी असून सर्व समूदायाना सोबत घेऊन आनंद साजरा केला जात आहे हे कौतुकास्पद आहे. सर्व धर्मीय मित्रपरिवार मंदिरात शिरखुर्म्याचा आनंद घेतात हे विशेष उदाहरण असल्याचे बागल म्हणाले.

politics

कुंभेज येथील पैगंबर पठाण, अमीन पठाण आणि आदम मकबूल शेख परिवार मागिल पाच वर्षांपासून ज्योतिर्लिंग मंदिरात सार्वजनिक स्वरूपात रमजान ईद आणि शिरखुर्म्याचा आनंद सर्वधर्मीयांसोबत एकत्र येऊन साजरा करत आहेत . याप्रसंगी पठाण कुटुंबियांकडून शिवसेना नेते दिग्विजय बागल यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी कुंभेजचे मा. सरपंच गोकुळ शिंदे, सुरेश शिंदे, कल्याणराव साळुंके, महादेव शिंदे, राजेंद्र शिंदे, दिलीप पवळ, बाबा शिंदे, संतोष शिंदे, अशोक पवळ, बलभीम पवळ, शंकर वाघमारे , पैगंबर पठाण, अमीन पठाण, आदम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल चौगुले, दादा जाधव, आश्रु तोरमल, किसन शिंदे, किशोर कदम, संतोष घोरपडे, सचिन शिंदे, तानाजी चांदणे, रविंद्र पवळ, . सोमनाथ पवळ तसेच कुंभेज मधील बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE