E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी तालुक्यातील शिंदेची निवड ; टॅंम्पो चालकाच्या मुलाची घोडदौड सुरुच

करमाळा समाचार 

जिद्द व चिकाटीच्या जोरावर काहीच अशक्य नसते हे नवोदित खेळाडु सुरज शिंदेने दाखवून दिले आहे. करमाळा तालुक्यातील कोळगाव या ग्रामीण भागातील टेम्पो चालकाच्या मुलगा असुनही मोठी स्वप्ने पाहिली. व ते आता पुर्ण होऊ पहात आहेत. सुरजचे वडील कैलास शिंदे कामानिमित्त पुणे येथे गेल्यानंतर सुरजने स्वकष्टाने महाराष्ट्र क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे.

बीसीसीआय अंतर्गत होणाऱ्या पंचवीस वर्ष आतील वयोगटातील एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी सुरज शिंदे याला मिळाल्याने तालुक्यात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

२०१९ मध्ये झालेल्या डेक्कन ट्रॉफी मध्ये सूरजने उत्कृष्ट फलंदाजी करत बेस्ट बॅट्समन चा अवॉर्ड मिळाला होता. असेच सर्व सामन्यात सात्यत्य ठेवल्याने सुरजची बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट सी. के. नायडु या स्पर्धांसाठी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र संघातून खेळायला जाणारा सुरज हा करमाळा तालुक्यातील एकमेव खेळाडू आहे.

२३ वर्षाखालील सामन्यात खेळत असताना सुरजने गुजरात विरोधात ७६ चेंडुत ८७ तर जम्मु कश्मीर विरोधात ३९ चेंडुत ६१ धावा ठोकल्या तसेच यावर्षीच्या निवडपुर्व सामन्यात ६०, ५५, ४५ धावा करुन संघाला विजयापर्यत पोहचवले आहे त्याच्या जोरावर सुरजची निवड २५ वर्षाखालील संघात झाली.

नुकतेच पंचवीस वर्षे खालील एकदिवसीय सामन्यांची सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्राकडून सुरज शिंदे यांना संधी मिळाली आहे. त्रिपुरा, मुंबई, झारखंड, गुजरात, चंदिगड अशा संघासोबत त्याच्या संघाचा सामना खेळवला जाणार आहे. विकेट किपर बॅट्समन म्हणून त्याची वर्णी या संघात लागलेली आहे. यापुर्वीच्या मालिकात कमी चेंडूत अर्ध शतक ठोकणारा तसेच मॅन मॅच जिंकून देण्यात त्याचे बऱ्याच सामन्यात योगदान असलेला हा खेळाडू आता या एकदिवसीय सामन्यांमध्ये कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्ट्र राज्यासाठी खेळणे हे नेहमीच माझे स्वप्न राहिले आहे आणि यावर्षी २५ वर्षांखालील राज्य एकदिवसीय स्पर्धेसाठी माझी निवड झाली आहे. मी आगामी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी आणि माझ्या राज्य संघासाठी सामने जिंकण्यासाठी उत्सुक आहे. मी सामन्यांसाठी खूप उत्सुक आहे आणि संघासाठी १०० टक्के देईल. मला विश्वास आहे की ही फक्त सुरुवात आहे आणि मी या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार मानतो. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि त्यांच्या आशीर्वादांसाठी मी देव आणि माझे कुटुंब आणि मित्रांचे आभार मानतो.
सुरज शिंदे , क्रिकेट खेळाडु

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE