छायाचित्रकारांची कर्जत येथे एक दिवसीय कार्यशाळा व आयडी वाटप
करमाळा
कर्जत मध्ये केकेआर फोटोग्राफर युनियन व पारस इलेक्ट्रॉनिक अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय कार्यशाळा व ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कर्जत, करमाळा, मिरजगाव, महिजळगाव व राशीन परिसरातील सर्व छायाचित्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

” जशी दृष्टी तशी सृष्टी” असे म्हटले जाते, एक चांगले छायाचित्र दहा निबंधांचे वर्णन करू शकते. एवढे सामर्थ्य त्या छायाचित्रांमध्ये असते,फोटोग्राफी ही एक अशी कला आहे कि यामध्ये उज्वल करिअर निर्माण करण्याची संधी उपलब्ध आहे.
जाहिरात, पत्रकारिता, मॉडेलिंग, प्री-वेडिंग,वेडिंग फोटोग्राफीची खूप मोठे विस्तारित असे क्षेत्र आहे. कर्जत व करमाळा तालुक्यातील छायाचित्रकारांनी अद्यावत राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व अद्यावत ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केकेआर फोटोग्राफर युनियनच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे सागर डाळिंब यांनी सांगितले.
प्रवीण बोरकर,महिंद्र मांडगे,भाऊसाहेब गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. पारस इलेक्ट्रॉनिक्स अहमदनगर यांच्या सहकार्याने कॅनॉन,पॅनासोनीक, डीजीआय आदी कंपनीच्या नवनवीन कॅमेऱ्याची माहिती व मार्गदर्शन छायाचित्रकारांना करण्यात आले.

वैभव खळे यांनी अद्यावत फोटोशॉप प्रणालीची माहिती देत मोलाचे मार्गदर्शन केले. तुकाराम सायकर, शिरीष यादव, आकाश बिडगर यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी विवेक कोकमठाणकर, रुपेश कनोजिया, दीपक गोरडे, धीरज जमदाडे, प्रमोद मोहिते, विनीत सिंग,सिद्धार्थ डावरे, सुमित भैलुमे,माऊली जाधव, अक्षय फरताडे, दत्ता ससाणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश तेलंग व राजेंद्न झिंजाडे यानी सर्वांचे आभार व्यक्त केले.सर्व फोटोग्राफर बांधवाना पुढील वाटचालीस शुभेच्छा.