Uncategorized

ग्रामपंचायतीच्या विरोधी गटातील सदस्यांच्या प्रयत्नातुन झेड पी शाळेला संगणक संच ; आ. शिंदेंकडुन मागणी मान्य

करमाळा समाचार

हिवरवाडीचे सदस्य जयराज चिवटे व भारती मेरगळ यांच्या विनंती ला मान देत तालुकयाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी हिवरवाडी येथील जिल्हापरिषद शाळेस तीन संगणक संच भेट दिले आहेत. यावेळी गावातील महिलांच्या हस्ते पुजन करुन सदरचे शाळेस प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन जयराज चिवटे व उपसरपंच नाना गुळवे, शालेय समीती अध्यक्ष कैलास पवार, संजयमामा समर्थक नंदु इरकर आदि उपस्थित होती.

यावेळी बोलताना चिवटे म्हणाले की, यापुर्वी आ. संजयमामा यांनी आमच्या विनंतीवरुन गावासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी ५३ लाखाचा निधी दिला होता. तर यावेळी उद्घाटनाला आल्यानंतर आ. संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कडे आपण मागणी केली त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मागणी मान्य केली व तेच आज संगणक संच मिळत आहेत. येणाऱ्या काळातही जेवढी गावासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचा राहिल .

भारती मेरगळ, सोनाली पवार, निलम पवार यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी नंदू इरकर, दत्तात्रय मेरगळ, शाळा समिती व्यवस्थापन अध्यक्ष कैलास पवार उपसरपंच, नानासाहेब गुळवे , शाळेचे मुख्याध्यापक गबाले गुरूजी, वारे गुरुजी, व्हटकर गुरुजी, काळे मॅडम , गायकवाड मॅडम, जोशी गुरुजी, अंगणवाडीच्या पवार, इरकर मॅडम आदि उपस्थीत होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE