वाळुचोरीसह विविध तालुक्यात ११ गुन्हे दाखल असलेल्या माढ्याच्या एकाला बार्शीत अटक ; करमाळा पोलिसांची कारवाई
समाचार टीम –
मागील वर्षभरापासून विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला एक संशयित आरोपी हा बार्शी येथे मिळून आला आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये शासकीय कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गुंडगिरी, वाळु चोरी, मारामारी, दमबाजी करणे असे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई करमाळा पोलिसांनी बार्शी येथे जाऊन केले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून संशयित हा फरार होता. तर निवडणुकांच्या आधी तो हाती लागल्याने बऱ्याच गावात ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे सांगितले.

विलास नरहरी उबाळे रा. म्हैसगाव ता. करमाळा असे त्या फरार संशयताचे नाव आहे. सदरची कारवाई २७ जुलै रोजी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सोमनाथ कांबळे व सोमनाथ जगताप यांच्या पथकाने बार्शी येथे केली आहे.

*पठारावर चढाई करण्यासाठी गेल्यानंतर उमरड येथील एका युवकाचा मृत्यु ; बारामती येथील विद्यार्थी गेले होते ट्रेकिंगला*
बार्शी, कुर्डूवाडी, माढा, करमाळा अशा ठिकाणी वेगवेगळ्या गुन्ह्यात हवा असलेल्या आरोपीच्या शोधात करमाळा पोलिस होते. वर्षभरापुर्वी वाळु चोरीचा गुन्हा दाखल झाल्यापासुन तो फरार होता. तर यापुर्वीही त्याने बाहेर तालुक्यात एकाला जीव मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा अशा प्रकारचे गुन्हे केले होते. तो सतत गुन्हेगारी करत असल्याने त्याला पोलिसानी मोक्का सारखी कारवाईही त्यावर केली होती पण तो यातुन सुधारणा करुन घेत नव्हता. अखेर त्याच्यावर करमाळ्यात दाखल असलेल्या गुंह्यात त्याला अटक करण्यात आली.
*प्रेमात पळुन आलेल्या मुलीवर वेड्यासारखे फिरण्याची वेळ ; करमाळा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरुप घरी*
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना संशयित हा बार्शी येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कोकणे यांनी चालक सोमनाथ कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप यांना सोबत घेऊन बार्शी येथे तपास केला. यावेळी तो बार्शी शहरात मिळून आला. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन करमाळा न्यायालयात हजर केले. त्यावेळेस न्यायालयाने त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी तर नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे.