करमाळासोलापूर जिल्हा

शाळा आहे की मद्यशाळा ; बंद शाळा बनल्या जुगाऱ्यांचा अड्डा

करमाळा समाचार


ग्रामीण भागातील बंद शाळा आता जुगाऱ्यांचा अड्डा बनू लागले आहे. अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने त्या ठिकाणी जुगारी व मद्यपींनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे शाळेचा परिसर दुर्गंधीयुक्त व घाणेरडा दिसू लागला आहे. पोलीस प्रशासन तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

असाच काहीसा प्रकार चिखलठाण क्रमांक एक येथील एका जिल्हा परिषद शाळेत दिसून आला आहे. शाळेत मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात असून त्या ठिकाणी मद्यपान केले जात आहे. शिवाय इथेच थुंकले जात आहे व दारूच्या बाटल्या टाकून दिल्या तसेच फोडल्या जात आहे. त्यामुळे शाळा आहे का मद्यशाळा हे कळून येत नाही. याबाबत तक्रार स्थानीक नागरीकांनी फोटो सह करमाळा समाचार कडे केली आहे.

अनेक दिवसांपासून कोरोना पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने शिक्षक व विद्यार्थी शाळेकडे जात नाही. त्यामुळे याचा फायदा उचलत हे मद्यपी, जुगारी त्या ठिकाणी बसुन शाळेचे पावित्र्य खराब करत आहे. ही परिस्थिती फक्त चिखलठाण येथेच असेल असे नाही गावोगावी हीच परिस्थिती असून त्या त्या परिसरातील नेतेमंडळींनी याची पावित्र्य भंग होणार नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर मद्यपी व जुगाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिल्या पाहिजे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE