चोरी करुन पळुन जाताना तीन पैकी एकाला पोलिसांनी पकडले ; रात्रीत घडला सिनेस्टाईल थरार
समाचार टीम –
घरासमोर लावलेल्या टिपर मधील दोन बॅटरी घेऊन पळून जात असताना करमाळा पोलिसांनी एकास अटक केली आहे. सदरची घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली होती. यानंतर गणेश श्रीकृष्ण कांबळे रा. लव्हे ता. करमाळा यांनी करमाळा पोलिसात रात्री दोन वाजता याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत त्या दिशेने एक पथक रवाना केले. या पथकाला माहिती मिळाली की, वांगीच्या दिशेने चोरटे जात आहेत तात्काळ पोलिसांनी पाठलाग करून त्यातील एकास जेरबंद केले तर एक पळून गेला आहे.

लव्हे रोड जेऊर येथे कांबळे यांच्या मालकीच्या असलेल्या टाटा कंपनीचा एक टिपर असून त्याचा आरटीओ पासिंग नंबर wb45-1099 च्या दोन बॅटऱ्या अज्ञात तीन इसमानी मुद्दाम लबाडीने संमतीशिवाय चोरी करण्याच्या उद्देशाने घेऊन गेले. त्यानंतर सदरची तक्रार कांबळे यांनी करमाळा पोलिसात दिली.

सदर घटनेचे फिर्यादी हे रात्रीचे दोन वाजता पोलीस ठाण्यास फिर्याद देण्यात आल्यानंतर ठाणे अंमलदार यांनी त्यांच्या झाले चोरीबाबत माहिती ही रात्रग्रस्त पोलीस अधिकारी सपो नि सागर कुंजीर यांना माहिती दिली. त्यांनी सदरची घटना ही अतिशय गांभीर्याने घेऊन त्यांच्या अधिपस्त अंमलदारांना योग्य त्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी स्वतः पोलीस शिपाई ज्योतीराम बारकुंड यांना सोबत घेऊन सदरचा परिसर हा पिंजून काढला. त्यामध्ये वांगी गावाच्या दिशेने आरोपी हे जात असल्याचे समजुन आले. त्यांचा सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करून पाठलाग करत असताना दोन आरोपी हे पावसाचा व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एक बॅटरी घेऊन पळून गेले. तर एक आरोपी याला बॅटरी सह रंगेहात पकडले.
करमाळा पोलिसांनी घटनेची दखल ही तात्काळ घेऊन गुन्हेतील आरोपींचा शोध घेऊन अवघ्या काही तासातच चोरट्यांच्या मुस्क्या अवल्या. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय उप विभागीय पोलीस अधिकारी माननीय डॉ. विशाल हिरे साहेब यांच्या देखरेखीखाली, करमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कोकणे सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस नाईक गवळी करीत आहेत.