E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

पाण्याआडुन राजकारण करु नका अन्यथा शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवतील ; करमाळा, कर्जत, श्रीगोंदा व पारनेर शेतकरी अडचणीत

करमाळा समाचार 

कुकडी प्रकल्पातून करमाळा, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा अशा तालुक्यांना पाणी मिळणे अपेक्षित असताना आजपर्यंत ते कमी जास्त प्रमाणात मिळत होते. परंतु मागील वर्षभरात रोहित पवार यांच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीने मिळाल्यानंतर त्यातही आता राजकारण करून काही मोजक्या शेतकऱ्यांच्या आडून चार तालुक्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे तुमचे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका अन्यथा शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवतील असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष संजय (बापू ) घोलप यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील काही शेतकरी कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी त्यावर निर्णय देताना न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिली आहे. वास्तविक पाहता अचानक पाणी सोडायचे किंवा नाही हा निर्णय घेणे शेतकऱ्यांच्या मुळावर येऊ शकतो.

कमीत कमी तीन ते चार महिने आधी कल्पना दिल्यानंतर पाणी बंद केल्यास शेतकऱ्यांचे पीक वाया जाणार नाही किंवा जळून जाणार नाही. याची काळजी शासनाने घेणे गरजेचे होते. अचानक आलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे.

आमदार रोहित पवार हे मागील एक वर्षापासून कर्जत जामखेड चे आमदार म्हणून काम पाहत आहेत. त्यावेळी पासून पहिल्यापेक्षा बर्‍यापैकी कुकडीचे आवर्तन योग्य नियोजन बद्ध कार्यक्रमाने झाली. परंतु हेच काही जणांच्या डोळ्यात खुपत असल्याने त्यांनी याला विरोध करण्यासाठी रोहित पवारांना निशाणा करण्यासाठी पाण्यात आडुन काही शेतकरी सोबत घेतले व आवर्तन कसे थांबवता येईल याची काळजी घेतली आहे.

त्यामुळे रोहित पवारांना बदनाम करण्याच्या षड्यंत्र असला तरी यातून शेतकरी अडचणीत येत आहे. याची नोंद विरोधकांनी घेणे गरजेचे होते. सध्या कोरोना काळ आहे लोकांना अनेक अडचणी असताना राजकारण करण्यात अर्थ नाही. त्यामुळे पाण्याकडून काही शेतकऱ्यांना घेऊन राजकारण करणे बंद करा. अन्यथा करमाळा यासह इतर चार तालुक्यातील शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

हस्तक्षेप याचिकेनंतर पाणी कायमस्वरूपी मिळावे म्हणुन याचिका …
कुकडीच्या आवर्तनावर स्थगिती दिल्यानंतर आता श्रीगोंदा येथील मारुती भापकर हे शेतकरी हस्तक्षेप करत याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी आहे. निकाल लागेल किंवा समोरचे विरोध करणारे माघार घेतील तरीही पुढील काळात कोणी विरोध करु नये यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE