करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

एकाचा गळा कापला, एकाला गळ्याला जखम तर एकाचे शर्टवर निभावले ; आज उद्या घ्या काळजी

करमाळा समाचार 

करमाळा तालुका व परिसरामध्ये नागपंचमी निमित्ताने पतंग उडवले जातात. यासाठी लागणाऱ्या मांजा व पतंगाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. साधारण दोऱ्यासह वेगवेगळ्या प्रकारचे दोरे सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये धोकादायक असा नायलॉन द्वारा हाही पतंग उडवण्यासाठी वापरला जातो. यावर बंदी असतानाही सर्रास सर्वत्र विक्रीसाठी ठेवला गेला आहे. त्यामुळे मोटारसायकलवर प्रवास करताना काळजी घ्यावी याआधी जीवघेण्या घटना घडल्या आहेत.

साधारण दोऱ्यापेक्षा नायलॉन द्वारा हा तुटण्यासाठी कठीण असतो व त्याने बराच काळ पतंग हवेत उडवताना दुसऱ्याकडून कापाकापी होण्यास अडचणी येतात. त्यामुळे या दोऱ्याला पसंती दिली जाते. परंतु सदर दोरा जेव्हा कुठे रस्त्यामध्ये पतंग कापून गेल्यानंतर अडकलेल्या परिस्थितीत असतो त्यावेळी सदरचा मांजा हा रस्त्यावर वाटसरूंना येता जाता अडथळा निर्माण करू शकतो. बऱ्याच वेळा सदरचा मांजा हा झाडात किंवा खांबाला अडकल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकल किंवा वाटसरूंना याच्यापासून धोका निर्माण झाला आहे.

politics

सदरच्या मांजामुळे गाडीवरून जाणाऱ्या लोकांचे गळे कापण्याचे प्रमाणही दिसून आले आहे. मागील वर्षी अशाच पद्धतीने रस्त्यावरून जाणाऱ्या एकाचा गळा कापला गेला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचला. पण जखम मात्र खोलवर झाली होती. पंधरा ते सोळा टाके घेण्यात आले. थोडीशी जास्त जखम खोल असती तर त्याचा नाहक जीव गमवावा लागला असता. त्यामुळे अशा प्रकारच्या मांज्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

मांज्यावर बंदी असतानाही कुठेही उपलब्ध होतो व सहज मिळतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा मांजा विक्री केला जात असल्याने याचा धोका अधिक आहे. लहान मुलांची बोटे नाजूक असतात त्यामुळे ते कापू शकतात. तर अडकलेल्या मांज्यामुळे पक्षांसह माणसांनाही जीवाला मुकावे लागू शकते. त्यामुळे याची घातलेली बंदी कायम ठेवत कारवाई करणे अपेक्षीत आहे.

मागील वेळी देवीचामाळ रस्त्यावर मांज्यामुळे झालेल्या अपघातात आयुब शेख यांच्या गळ्याला कापले गेले होते. ते रस्त्याने जात असताना मध्येच लटकत असलेला मांजा त्यांच्या गळ्यात अडकला व त्याने मोठी जखम झाली. यावेळी सुदैवाने ते वाचले. तर मागील दोन दिवसांपूर्वी करमाळा नगरपरिषद शाळेचे शिक्षक भालचंद्र निमगिरे हे मोटरसायकलवर घरी जात असताना रस्त्यावर अडकलेल्या मांज्यामुळे गळ्याला मांज्या अडकला यावेळी वेळीच गाडी थांबवल्याने मोठी हानी टळली. उमरडचा एक व्यक्ती करमाळ्यात बायपास रोडला 6 तारखेला मोटारसायकल वरून येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर मांजा अडकला होता. त्याची दंडा वरती शर्ट फाटुन गेला पण एक ट्रक आडवा गेला म्हणुन तो मांजा तुटला म्हणून शर्टवरती भागले नाहीतर गळ्याला अडकला असता. सदर मांजावर लक्ष देण्यासाठी पोलीस तसेच दुकाने निरीक्षक ही यंत्रणा असते. त्यांनी वेळीच यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE