E-Paperकरमाळाताज्या घडामोडीसकारात्मक

तंबाखू मुक्त शाळा अभियानात करमाळ्यातील ‘ही’ जिल्हा परिषद शाळा ; सोलापूर जिल्ह्यात प्रथम

करमाळा समाचार 

भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील उमरड जिल्हा परिषदेची शाळा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील पहिली तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे.
आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारीत नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.

यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे.या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक सिताराम भिल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक अनिल यादव यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभिमान शाळेत राबविले आहे. उमरड शाळेने नवीन वर्षात नऊ दिवसात नऊ निकष पूर्ण करून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.

शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी राजाराम भोंग साहेब, शिक्षणविस्ताराधिकारी अनिल बदे साहेब, केंद्रप्रमुख नवनाथ ससाने आदींनी शाळेचे अभिनंदन केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE