तहसिल कार्यालय बाहेर नेण्यास विरोध ; उद्या आबांचे धरणे आंदोलन
करमाळा समाचार
करमाळा तहसील कार्यालय स्थलांतरास जाहीर विरोध करीत टेंडर प्रक्रिया रद्द करावी यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या वतीने उद्या दि 9 वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी विरोध दर्शवणाऱ्या प्रत्येकाने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

करमाळा शहरातील प्रमुख कार्यालय असलेले तहसीलसह इतर महत्त्वाची कार्यालय हे गुळसडी रस्त्याला नेले जाणार आहे. याचा विरोध तालुक्यात सर्व स्तरातून केला जात आहे. तर काही दिवसांपूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजनही करण्यात आले आहे. तर याची टेंडर प्रक्रिया सुरू असून ती प्रक्रिया थांबवावी असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे.
