करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सीमोल्लंघनासाठी अवघ्या ११ मिनिटात देवीचा छबीना पोहचला ; मंचकी निद्रेस प्रारंभ

करमाळा समाचार – विशाल घोलप (९४०४६९२४४०)

विजयादशमी दिवशी सीमोल्लंघन करून महिषासुराच्या वधासाठी कमला भवानी आपला भाऊ खंडोबासह जाते अशी आख्यायिका आहे. त्याप्रमाणे कमलाभवानी मंदीरात नवरात्री नंतर दसऱ्या दिवशी सदरचे सीमोल्लंघन केले जाते. या सीमोल्लंघनावेळी वेगळाच उत्साह भावीकांमध्ये पहायला मिळतो. यावेळी मंगळवारी दसऱ्याच्या मुहुर्तावर कमलाभवानी माता मंदीरात सिंहावर आरुढ होऊन छबीना काढला. छबीना केवळ दिड किमींचे अंतर आठ्ठावीस सेवेकरी व भक्तांच्या वेगवान शक्तीसोबत केवळ अकरा मिनिटात पार केला.

नवरात्री नंतर दसऱ्याच्या दिवशी तालुक्यातील देवीचामाळ पासून दीड किलोमीटर अंतरावर खंडोबाच्या माळावर कमला भवानी माता सीमोल्लंघनासाठी जाते यासाठी देवीला सिंहावर आरुढ केले जाते. खांदेकरी, दिवटे, सोरटे पुजारी, पुराणीक, कळवात व आराधी मंडळ हे सर्व भक्तांच्या सोबत देवीला खंडोबा माळ येथे घेऊन जातात. जाताना खंडोबा माळावरुन देवी आपला भाऊ खंडोबाला सोबत घेते याठिकाणाहुन त्यासोबत खंडोबाची पालखी पवार व अनभुले सेवेदारी हे सोबत जातात. सायंकाळी पाच वाजुन पंचावन्न मिनिटाने निघालेला छबीना अवघ्या आकरा मिनिटात खंडोबा माळ येथे पोहचवला जातो यंदाही तो पोहचवण्यात आला.

खंडोबा माळ येथे पोहचल्यानंतर पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे, तहसीलदार विजयकुमार जाधव व विश्वस्त यांच्या हस्ते सोने लुटणे(आपट्याची पाने) देण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर भावीकांना दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली. दोन्ही पालखी दरवर्षी पावसामुळे हिरवळ असलेल्या ठिकाणी विसावतात पण यंदा पाऊस नसल्यामुळे वाळलेले गवत चहुबाजुनी दिसत होते. रात्री आकरा वाजता मंदीरात देवी माघारी आणली जाते यावेळी वाहन टेकवले तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथे फुल पडुन आरती सुरु केली गेली.

मंचकी निद्रेस प्रारंभ ..
करमाळ्यातील कमलाभवानी मातेच्या दोन मूर्ती असून त्यामध्ये एक दर्शनासाठी प्रमुख गाभाऱ्यात स्थापन केली आहे. तर दुसरी शेजारीच एका गाभाऱ्यात उत्सव मूर्ती म्हणून पुजली जाते. सीमोल्लंघनानंतर पाच दिवस सदरची उत्सव मूर्ती असलेल्या गाभाऱ्याला बंद केले जाते. त्यामुळे तिचे दर्शन बंद असते. त्याला मंचकी निद्रा असेही म्हटले गेले आहे. तर कोजागिरीला पोर्णिमेला छबिना काढून पुन्हा एकदा उत्सव साजरा केला जातो.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE