करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बांध नाहीतर आता रस्तापण कोरला जातो ; अतिक्रमण काढा दोन सरपंचाची मागणी

करमाळा समाचार

कुगाव ते चिखलठाण क्रमांक दोन या मुख्य रस्त्यावर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले असून सदरचे अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी कुगाव गावचे सरपंच सुवर्णा पोरे व चिखलठाणचे सरपंच धनश्री गलांडे यांनी केले आहे. यावेळी सदरचे निवेदन तहसीलदार करमाळा यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक व जिल्हा परिषद बांधकाम यांना देण्यात आले आहे.

कुगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील कुगाव ते चिखलठाण क्रमांक दोन हा रस्ता सुमारे दोन किलोमीटर अंतरास आहे. हा रस्ता लोक वर्गणी करून रस्त्याच्या बाजूच्या अतिक्रमण काढण्यात काम चालू होते. परंतु त्या रस्त्यावर संबंधित शेतकऱ्यांनी ते काम गावातील नागरिकांना दमदाटी करून बंद करण्यास भाग पाडले. नंतर आम्ही कायदेशीर बाजूने जाण्यास ठरवल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा फोन आला करून घ्या त्यास माझी काही हरकत नाही.

परंतु प्रत्यक्षात काम करण्यात जेसीबी मशीन घेऊन गेले असल्यास काम बंद करून “कुठं पण जावा, काम करून देत नाही” असे म्हणून काम बंद पाडले. तरी आम्हा दोन्ही गावातील नागरिकांना येण्याजाण्यासाठी अडचण होत असून सदर अतिक्रमण बंदोबस्तात हटून मिळावे अशी मागणी यावेळी सरपंच पोरे व गलांडे यांनी केली आहे.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE