आंतरराष्ट्रीयस्तरावरील 650 लघुपटांपैकी करमाळा तालुक्यातील लघुपटाला दुसरा क्रमांक
प्रतिनिधी सुनील भोसले
सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्यातील सुपुत्र महादेव सुभाषराव मांढरे यांनी “कोरोना लागण” या चित्रपटाची निर्मिती केली होती. औरंगाबाद मधील रोशनी आंतरराष्ट्रीय महोत्सव लाईव्ह वितरण सोहळा मध्ये दिनांक 18 रोजी झालेल्या लघुपट महोत्सवात करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले महादेव मांढरे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

मांढरे हे कामानिमित्त पुणे येथे गेले असले तरी त्यांची जन्मभूमी करमाळा तालुक्यातील गौडरे आहे. मात्र कर्मभूमी पुणे आहे. त्यांचे वास्तव्य पुणे येथे झाले. त्यांना कोणताही अनुभव नसताना जिद्द आणि चिकाटी व आत्मविश्वास या बळावर पुणे येथील अलका फिल्म पुणे या प्रोडक्शनच्या माध्यमातून लागण कोरोनाची या लघुपटाची निर्मिती केली आणी औरंगाबाद येथे झालेल्या लघुपट महोत्सवात देशी विदेशातून आलेल्या 650 लघुपटात द्वितीय क्रमांक पटकावला.
या लघुपटाने लॉकडाऊन काळात कोरोनाची लागण सदृश परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी व घेतली पाहिजे. यावर लघुपटाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश दिला या अगोदर ही या लघुपटाने 8 राज्यात विविध बक्षिसे मिळावली आहेत. महादेव मांढरे यांच्याशी सर्पंक साधला असता म्हणाले, मला कसलाही अनुभव नसताना माझी मीच इच्छा शक्ती तयार केली आणी ठरवलं मी लघुपटाची निर्मीत करणारच इथुन पुढे माझं स्वप्न आहे. भविष्यात मोठी भरारी घेणार आणी करमाळा तालुक्याच देशाच्या कानाकोपऱ्यात नाव लैकिक करणार असे मांढरे म्हणाले. त्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक करमाळा तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी केले.
