करमाळासोलापूर जिल्हा

दहा महिण्यांपासुन पगार नसल्याने तालुक्यातील गटसचिवांचे कामबंद आंदोलन

करमाळा तालुक्यातील गटसचिवांचे काम बंद आंदोलन करणेचा इशारा : मा . आ . जयवंतराव जगताप, आ. संजयमामा शिंदे , जिल्हा उपनिबंधकासह अन्य अधिकार्‍यांकडे नियमितपणे पगार करणेबाबत केली लेखी मागणी

करमाळा समाचार 

तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्वच वि . का . सेवा संस्थांच्या गटसचिवांचे पगार नसल्यामुळे अतोनात हाल सुरू असून पगार नियमित पणे करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व गटसचिवांनी माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा उपनिबंधक सह संस्था सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती, सहाय्यक निबंधक सह .संस्था करमाळा, प्रशासक सोलापूर जिल्हा मध्य सह बँक , अवसायक सोलापूर जिल्हा देखरेख सह संस्था यांना लेखी निवेदन देवून काम बंद आंदोलन सुरू केले आहे .

सोलापूर जिल्हा देखरेख सह संस्थेवर अवसायक नेमुण जिल्हास्तरीय समितीकडे कामकाज गेलेपासून सतत सचिवांचे पगार थकत असून पगार विना कामकाज करणे व प्रपंच चालवणे गटसचिवांना मुश्किल झाले आहे . बॅकेचे व शासनाचे धोरणाप्रमाणे कर्जमाफी व वसुलीची सातत्याने प्रामाणीकपणे कामे करून देखील केडरवर अवसायक, बँकेवर प्रशासक, जिल्हास्तरीय समितीचे दुर्लक्ष यामधे गटसचिव भरडला जात असून सचिवांवर उपासमारीची वेळ आली आहे . संस्थेचे कामकाज करणेसाठी, वसूलीला जाणेसाठी पगार जर नसेल तर पेट्रोलला शे – दोनशे देखील त्यांचेकडे नाहीत . सादीलचे पाचशे रुपये खर्चाची देखील परवानगी नाही अशा परिस्थितीत सचिवांना काम करणे अवघड आहे .

सोलापूर जिल्ह्यात शेतकर्यांचे जीवनात परिवर्तन व आर्थिक क्रांती घडविणार्‍या जिल्हा बँकेशी संलग्न वि .का . सोसायट्यांच्या पगारी नियमितपणे होत नाहीत ही बाब लाजिरवाणी असून याबाबत जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी नेते आ.बबनदादा शिंदे,आ संजयमामा शिंदे, आ .प्रशांत परिचारक, माजी आ. राजन पाटील, माजी आ.जयवंतराव जगताप, माजी आ.दिलीपराव माने या बड्या नेतेमंडळींनी सचिवांच्या प्रश्नात लक्ष घालून सचिवांच्या पगारी नियमीतपणे होणेसाठी प्रयत्न करावेत अशी गटसचिव मंडळीची प्रामाणीक इच्छा आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE