व्हॉट्सअप ग्रुप च्या माध्यमातून कोवीड रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीन; एका तासात जमा झाले चाळीस हजार
कन्हेरगाव – धनंजय मोरे
सध्या सोशल मिडिया ने संपूर्ण जगाला वेड केले आहे. आजकालची तरुणाई सोशल मिडीयावर व्हॉट्सअप, फेसबुक वर रात्रंदिवस बिझी असते. याचा कोण चांगले पध्दतीने वापर करतो तर काहीजण गैरफायदा ही घेत आहेत. परंतु माढा तालुक्यातील ‘दादा मामा स्वाभिमानी 36 गाव ‘ या नावाने तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअप ग्रुप ने सर्वांनाच आदर्श वाटावा अशी सामाजिक बांधीलकी जोपासत कोविड रुग्णांसाठी एक ऑक्सिजन मशीन फक्त एक तासात लोकवर्गणीतून आणल्याने आदर्श निर्माण केला आहे.

कोरोना परिस्थिती बिकट होत असताना बर्याच पेंशट साठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत अशा बातम्या येत आहेत व आसपास च्या परिसरात पण तीच परिस्थिती असल्यामुळे आपणच ऑक्सिजण मशीन कोविड सेंटर ला का देऊ नये असा विचार दादा मामा स्वाभिमानी 36 गाव या व्हॉट्सअप ग्रुप चे अॅडमिन डाॅ. विनोद चव्हाण यांच्या मनात आला आणि त्या नुसार त्यांनी वरील दादा-मामा स्वाभिमानी 36 गाव ह्या नावाच्या ग्रुप वर मेसेज टाकून कल्पना मांडली. ती कल्पना सर्वाना आवडली आणि ग्रुप वरील सदस्यांनी 500 रुपये ते 5555 रूपये पर्यत फोन पे, गुगल पे, काहीजण रोख रक्कम अशा पध्दतीने जवळपास चाळीस हजार रूपये एका तासात लोकवर्गणीतून जमा झाले. त्यानंतर चाळीस हजार रुपयांपर्यंत ची कोविड रुग्णांसाठी एक ऑक्सिजन मशीन सांगली येथून खरेदी करण्यात आली असून ती ऑक्सिजन मशीन कोविड सेंटर कुर्डूवाडी येथे देण्यात येणार आहे. या चांगल्या उपक्रमाबद्दल या व्हॉट्सअप ग्रुप च्या सर्व सदस्यांचे आ. बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांनी कौतुक केले आहे.