करमाळासोलापूर जिल्हा

जिजाऊ ब्रिगेडच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी पल्लवीताई शिंदे यांची निवड

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले


जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरीताई भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभागीय जिल्हाध्यक्ष शिवमती सुरुजा ताई बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या पल्लवी ताई शिंदे यांची जिजाऊ ब्रिगेड करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‌ जिल्हाध्यक्ष सुरजा ताई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र पल्लवी ताई शिंदे यांना देण्यात आले .

हरेक जिजाऊंची लेक, वाघीण झाली पाहिजे या उद्देशाने प्रत्येक महिला वैचारिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या, सक्षम करणे..तसेच आपण सर्व जिजाऊंचे लेकीनी एकमेकांच्या साहाय्याने मन मनगट मेंदू सशक्त करून युगपुरुष खेडेकर साहेबांची स्वप्नातील महिलाराज राष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल परिवर्तनाकडे टाकायचे आहे असे जिल्हाध्यक्ष सुरजाताई बोबडे कार्यक्रमावेळी ते बोलत होत्या.

यावेळी जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र पंढरपूर विभागाचे कार्याध्यक्ष रत्नमाला शिंदे,प्रियंका खटके तसेच जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE