वादळी वाऱ्यापासून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी
करमाळा समाचार
आज दिनांक चार जून रोजी वांगी व वांगी परिसरामध्ये वादळे वाऱ्यासह पावसाच्या सरी आल्या होत्या. या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे. शेतकऱ्यांचे केळी, दोडका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. तरी सदर नुकसानीचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराज सातव यांनी केली आहे.

वांगी परिसरामध्ये केळीच्या जवळपास 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
