करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

बिटरगावकरांच्या मागणीला यश ; उपसा बंद पण कारवाईची प्रतिक्षा

करमाळा समाचार

तालुक्यातील बिटरगाव श्री येथे वाळू उपसा सुरू असल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर करमाळा समाचारच्या वतीने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर गावात वेगवेगळ्या ठिकाणी पंचनामे केले त्यानंतर वाळू उपसा करणाऱ्या माफियाची धाबे दणाणले असून वाळू उपसा बंद केला आहे.

वारंवार सूचना देऊन व संबंधित विभागाकडे तक्रारी करून कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी सदरची बाब ही पत्रकारांच्या माध्यमातून उघडकीस आणली होती. यामध्ये भाऊसाहेब मुरूमकर व दिलीप मुरूमकर यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे. गावातील वाळू उपसा पूर्णपणे बंद झाला असून आता कारवाईच्या प्रतीक्षेत असल्याचे मुरूमकर यांनी सांगितले.

तक्रारी केल्यानंतर ही संबंधित वाळूमाफिया माझे कोण काय वाकडे करू शकत नाही. माझे सर्वांची संबंध असल्याच्या बाता मारत होता. परंतु सदर प्रकरण करमाळा समाचार मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील कारवाईला वेग आला व संबंधित वाळूमाफयाने वाळू उपसा करणे बंद केले आहे. हा आमचा एक प्रकारे विजयीच आहे. पण अद्यापही कारवाई न झाल्याने आम्ही त्याची वाट पाहत आहोत. – भाऊसाहेब मुरुमकर, बिटरगाव श्री.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE