करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पांडे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

करमाळा समाचार

पांडे ता.येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे, सरपंच बाळासाहेब अनारसे, माजी सरपंच तुकाराम शिरसागर, पत्रकार सुनिल भोसले हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव भोसले, विकास भोसले, माजी उपसरपंच, नितिन निकम, दस्तगीर मुजावर, शिवाजी भोसले, मिलिंद भोसले,तंटामुक्ती इन्नुस मुजावर उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त मिरवणुकीत नटराज ब्रास बाॅन्ड बारामती साई बँजो पांडे यांच्या सह गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली,यावेळी फटाक्यांची आतषबाजी व विद्युत रोषणाईत करण्यात आली होती.

politics

अण्णाभाऊ साठे मित्र मंडळांचे अध्यक्ष संजय लांडगे, युवा नेते प्रमोद लांडगे, साजन लांडगे, माणिक भोसले, रामदास भोसले,आमोल लांडगे, रवींद्र लांडगे , वेताळ लांडगे, आजिनाथ कांबळे ,बाळू लांडगे सतिष लांडगे सुरज लांडगे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी जयंती शांतेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE