पॅनल प्रमुख सवितादेवी राजेभोसले यांचा अर्ज मंजुर होणार ?
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छाननीच्या वेळी मोहिते पाटील समर्थक पॅनलच्या प्रमुख सवितादेवी राजेभोसले यांच्यावर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या शेअर्सची अपूर्ण रकमेचा हवाला देत आक्षेप घेण्यात आला होता. त्या शेअरची आता सवितादेवी राजेभोसले यांनी पूर्तता केलेली माहिती समोर येत आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतील त्यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला जाऊ शकतो का? यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बऱ्याचशा उमेदवारांवर मकाई व आदिनाथ येथे शेअरच्या अपुऱ्या रकमेतून आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्याची पूर्तता करण्याची तयारी सर्वच उमेदवारांनी दाखवली होती. त्यामुळे त्या मर्यादित वेळेत जर संबंधित उमेदवारांनी आपली शेअरची रक्कम भरलेली पावती जमा केल्यास त्यांना ग्राह्य धरण्यात येईल का ? पुढे नेमके काय होईल असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे सध्या तरी सवितादेवी राजेभोसले यांनी सदर रक्कम जमा केलेली पावती घेऊन आले आहेत. थोड्याच वेळात यावर सुनावणी होऊन निर्णय जाहीर होईल.
