करमाळा अर्बन बँकेवरील रिझर्व बँकच्या निर्बधांना अंशत: शिथिलता
करमाळा समाचार
रिझर्व बँकेच्या निर्बधांनंतर करमाळा अर्बन बँकेवर दिनांक 21/04/2023 रोजी श्री. दिलीप तिजोरे यांची बँकेच्या प्रशासक पदी नेमणुक करण्यात आली. दिलीप तिजोरे यांनी बँकेचा चार्ज घेताच वसुली करणेकामी कडक धोरण अवलंबले कर्जदारांच्या गाठीभेटी घेवुन तर कधी भ्रमणध्वनीवरुन त्यांच्याशी चर्चा व विनंती करुन थकित कर्जाची वसुली केली. महाराष्ट्र शासनाची दिनांक 27 एप्रिल 2023 रोजीची 6% व्याजदराची एक रक्कमी कर्जपरतफेड योजना स्विकारुन एकुण 457 थकित कर्जखातेमधुन 163 थकित कर्जखाते बंद करुन 4 कोटी 13 लाखाची वसुली झालेली आहे.
शासन निर्णय योजनेनुसार वसुली झाल्याने बँकेच्या व्याज उत्पन्नात मोठी वाढ झालेली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी बँकेवरील निर्बध दिनांक 29 जुलै 2023 अखेर ठेवण्यात आलेले होते. परंतु प्रशासकाच्या काळात बँकेची वसुली चांगली झाल्याने बँकेला आर्थिक परिस्थिती सुधारणेकामी तीन महिण्याची मुदतवाढ दिलेली आहे. तसेच दिनांक 08 ऑगष्ट 2023 रोजी ईमेल व्दारे रिझर्व बँकेने बँकेच्या मुदत संपलेल्या 4 कोटीच्या हायपोथिकेशन कर्जाच्या नुतनिकरणास परवानगी दिलेली आहे. यामुळे बँकेच्या NPA मध्ये घट होवुन तो 8.5 कोटी पर्यंतचा राहण्याची शक्यता आहे. सदर बाबत बॅंकेच्या हिताची असुन यामुळे एक प्रकारे बॅंकेला अशंत : शिथिलता प्राप्त झाली आहे.
बँकेच्या प्रगतीच्या अनूषंगाने प्रशासक यांनी धडाडीचे प्रशासकीय व आर्थिक निर्णय घेऊन त्याच्या मंजूरी कामी शासन दरबारी पाठपूरावा करत आहेत. ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून रककम रूपये 10000/- पेक्षा अधिक रक्क्म काढण्यास परवानगी मिळावी याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कर्जदाराच्या वसुलीस वेग येण्यासाठी व बँकेस व्याज मिळणेकामी विशेष एक रक्कमी कर्ज परतफेड योजना शासनास मंजुरीसाठी सादर केले आहे.
बँकेने यापुर्वी जास्तव्याजदराच्या ठेवी स्विकारल्याने मार्च 2023साठी ठेवीवर 2 कोटी 40 लाख व्याजाची तरतुद करावी लागल्याने (Intrest payble) बँकेच्या तोटयात तेवढया रकमेची भर पडल्याने पुढील वर्षी त्यात घट व्हावी म्हणुन दिनांक 01 जुन 2023 पासून सर्व ठेवीवर 3 % व्याजाचा दर आकारण्यात आलेला आहे. त्यामुळे मार्च 2024 अखेर यातुन किमान 60 लाखाची बचत होणार आहे.
वीजखर्च कपात करणे कामी बँकेतील सर्व ए.सी बंद करुन इतर खर्च कमी केला आहे. कर्मचा-यावर होणा-या खर्चाच्या अनुशंगाने ज्या कर्मचा-याचे वय 50 वर्ष पुर्ण झाले आहे अथवा ज्या कर्मचा-याची सेवा 20 वर्ष पुर्ण झालेली आहे अशा कर्मचा-यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना तयार करुन शासन व रिझर्व बँकेच्या मंजुरीसाठी पाठविण्याचे नियोजन चालु आहेत. यामधुन बँकेच्या वेतनावर होणारा खर्च कमी होणार आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच बँकेच्या 4 अधिका-यांना कलम 156 अन्वये अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नाथाळ व जाणिवपुर्वक कर्ज थकविणा-या कर्जदाराकडुन कर्ज वसुली करणेकामी वेग येणार आहे.
बँकेने मागिल वर्षाच्या तुलनेत यावर्षी वसुल भागभांडवल 2 कोटी वाढविण्याचे नियोजन केले आहे. शासनाचे व रिझर्व बँकेचे महत्वाच्या कामकाजासाठी बँकेचे संगनिकरण सुधारणा करण्याचे नियोजीत केले आहे यासाठी रिझर्व बँकेची परवानगी अपेक्षित आहे.
बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण आवश्यक असल्याने विठठलराव विखे पाटील प्रशिक्षण पुणे यांच्याशी संपर्क करुन अध्यावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे नियोजित केले आहे.
बँकेकडे एकुण 38 कोटी 77 हजार ठेवी असुन बँकेची असणारी गुंतवणुक व ईतर बँकेतील शिल्लक अशी एकुण 31 कोटी 82 हजार ऐवढी रक्कम बँकेकडे शिल्लक आहे. बँकेने जुलै अखेर 20 लाखाची वसुली केलेली असुन उर्वरीत थकबाकीदारांवर योग्य त्या न्यायालयामध्ये दावे दाखल केले आहे. ज्या थकित कर्जदारांचा 101वसुलीचा निकाल लागलेला आहे. त्यांनी आपल्याकडील थकित रकमा तत्परबॅकेत भरावे अन्यता आपल्यावर जंगम अथवा स्थावर जप्तीची कारवाई करावी लागेल. बँकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी याकामी पुर्णत: झोकुन देवुन पुढील कालावधीत बँक नव्या जोमाने उर्भी करण्याचा चंग बांधला आहे याकामी सर्व सभासद, कर्जदार, ठेवीदार, माजी संचालक यांनी स्वत: पुढे होवुन आपली बँक व बँकेची अस्मिता ठिकविण्यासाठी आवश्यकते सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तिजोरे यांनी केले.