साडे ग्रामपंचायतीवर पाटील गटाची सत्ता, सरपंचपदी आडेकर यांची बहुमताने निवड
करमाळा समाचार
साडे ग्रामपंचायतीवर आमदार संजयमामा शिंदे यांची सत्ता होती. परंतू शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच सौ अनिता शशिकांत पाटील यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला व सदस्यांच्या पाठबळावर बहुमताने हा अविश्वास ठराव मंजूर झाला. यानंतर नुतन सरपंच पदाची निवड पार पडली व यात नुतन सरपंचपदी माजी आमदार नारायण पाटील गटाचे समर्थक अण्णासाहेब आडेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली.

साडे हे गाव पुर्व भागातील एक महत्त्वाचे गाव असल्याने या अविश्वास ठरावाकडे व नुतन सरपंचपदाच्या निवडीबाबत तालुक्यातील पुर्व भागात उत्सुकता होती. नूतन सरपंच अण्णासाहेब आडेकर यांचा माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साडे गावातील पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी या निवडीचा आनंद व्यक्त केला.
