करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

स्व. सुभाष आण्णांच्या पुण्यतिथी निमित्ताने 272 जणांची तपासणी ; 209 रक्तदान

करमाळा समाचार


कामगार नेते, हमाल पंचायत चे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय सुभाष आण्णा सावंत यांच्या ९ व्या पुण्यतिथी निमित्त ” हमाल भवन ” येथे सकाळी साडे नऊ वाजता स्व. सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे सुरूवात करण्यात आली .

या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर, डॉ. वसंतराव पुंडे, डॉ . हरिदास केवारे, डॉ. रोहन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोपाळ बापू सावंत, विठ्ठल आप्पा सावंत, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, डॉ. निलेश मोटे, डॉ. बाबुराव लावंड, डॉ. अनुप खोसे, डॉ. हर्षद माळवदकर, डॉ. विशाल केवारे, डॉ. दिपक केवारे, डॉ. संकेत सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या शिबिराचे आयोजन हमाल पंचायत व छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, सावंत गल्ली करमाळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या शिबीरा मध्ये शुगर, बीपी, ईसीजी तपासणी करण्यात आले. यावेळी २७२ जणांचे / रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यावेळी गरजूंना मोफत औषधोपचार देण्यात आला. तसेच या वेळी रक्तदान शिबिरामध्ये 209 रक्तदात्याने रक्तदान केले असून या रक्तदानाचे संकलन श्री.कमलाभवानी ब्लड सेंटर करमाळा यांनी केले. यावेळी रक्तदात्यांना जार वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड राहुल सावंत यांनी केले.

यावेळी बोलताना आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. वसंतराव पुंडे म्हणाले की, स्व. सुभाष आण्णांचे सामाजिक कार्य हे दिशादर्शक होते.त्यांच्या कार्याचा वसा व वारसा सावंत कुटुंब सक्षम पणे पुढे नेण्याचे काम करीत आहेत. राजकारणापेक्षा समाजकार्याला प्राधान्य देण्याचे काम स्व. सुभाष आण्णा यांनी केले. रक्तदान व आरोग्य शिबिर राबवून समाजाची एक प्रकारे सेवा केली असल्याचे ते यावेळी म्हणाले.

स्व. सुभाष आण्णा यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी बाजार समिती चे चेअरमन शिवाजी बंडगर सर, शहाजीराव देशमुख सर, चेअरमन प्रभाकर शिंदे ,सरपंच देविदास वाघ, मा सरपंच नामदेव शेगडे, सरपंच भोजराज सुरवसे, माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ, सरपंच लहू काळे, सरपंच केशव शेळके, ॲड .बाबुराव हिरडे , ॲड. बलवंत राऊत, ॲड. प्रमोद जाधव, ॲड. सुहास मोरे, माजी सरपंच भगवान भोई, माजी सरपंच अजित तात्या पाटील , माजी सरपंच सुग्रीव नलवडे, सरपंच गौतम ढाणे, माजी संचालक विठ्ठल शिंदे, माजी सरपंच महादेव वायकुळे, नगरसेवक अल्ताफ तांबोळी ,

नगरसेवक राजू आव्हाड , उत्कर्ष गांधी, चेअरमन मनोज गोडसे, अशोक शेठ शहा, गोरख ढेरे, माजी सभापती किसन शिंदे, विजय पवार, पप्पू शिंदे, श्रीहरी भोगल, गोकुळ मुरूमकर , शिवाजी मुरूमकर, संतोष वाघमोडे , पाराजी शिंदे, आण्णा झिंजाडे, जयद्रथ शिंदे, भागवत वाघमोडे, सतीश मोटे ,रावसाहेब शिंदे ,आबासाहेब वारे , विठ्ठल नलवडे , पै. बाळू कोळेकर, धनंजय शिंदे उपसरपंच, रणजीत बेरगळ, वैभव मुरूमकर, सचिन काळे अध्यक्ष, सुनील फुलारी, चंद्रकांत काळे चेअरमन , गणेश अंधारे ,माजी सरपंच बालाजी अंधारे , बापू खरात, माजी सरपंच बाळासाहेब काळे , बाळासाहेब गपाट, बाळनाथ रोडे, गौतम रोडे , मनोज राखुंडे , शुभम कदम, नगरसेवक ॲड नवनाथ राखुंडे,

पत्रकार अलीम शेख ,पत्रकार विवेक येवले , अशपाक सय्यद, सुनील भोसले, मा. संचालक प्रकाश झिंजाडे ,मदन काका देवी, मा. सरपंच राजेंद्र घाडगे, विश्वास काका बागल, अँड प्रशांत बागल, ॲड .बालाजी इंगळे ,राजेंद्र काळे, वैभव दळवी, दौलत वाघमोडे, सुशील नरूटे, सचिन गायकवाड, झुंबर कावळे , पिंटू हरणावळ, माजी सरपंच सुभाष पाटील, हरी मोरे, मोहन पडवळे , भाऊसाहेब शिंदे, आप्पासाहेब लांडे , हरिदास रेगुडे, लक्ष्मण गायकवाड , शिंगटे सर , दिलीप चव्हाण , दत्तात्रय आढाव, पै. दादा इंदलकर ,आझाद शेख उपस्थित होते.

रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत, सुनील बापू सावंत, वालचंद रोडगे, धनंजय सावंत, विठ्ठल रासकर, गजानन गावडे, रणजीत सावंत, ज्ञानदेव गोसावी, फारूक जमादार , वैभव सावंत,खलील मुलाणी, दिपक सुपेकर, भिमराव लोंढे, सुनील शेळके, शिवाजी आवटे, महादेव कांबळे, राजू कांबळे ,सतीश खंडागळे , सुभाष शेंडगे, राजकुमार सुरवसे, शरद वाडेकर, आकाश कुरकुटे, सागर सामसे, बापू उबाळे, विशाल रासकर, विशाल पवार, शिवराज गाढवे, अल्ताफ दारूवाले आदी जणांनी परीश्रम घेतले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE