करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आदिनाथवर पाटील गटाचा झेंडा ; गटनिहाय आकडेवारी

करमाळा समाचार

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पाटील गटाने मुसंडी मारत सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला आहे. तर शिंदे गटाकडून पहिल्यांदाच आदिनाथच्या मैदानात उतरलेल्या माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा केम गटातून अकराशे मतांनी पराभव झाला आहे. जगताप व बागल गटाने निवडणुकीत सहभाग न घेता छुपा पाठिंबा देत पाटील गटाच्या विजयात किंगमेकरची भूमिका बजावली. शिंदे गटाचा पराभव झाला असला तरी मागील वेळी पेक्षा यंदा मतात वाढ झालेली दिसून आली. तर सर्वाधिक मताधिक्याने निवडून येत नारायण पाटलांनी नेतृत्व सिद्ध केले आहे. प्रा. रामदास झोळ यांच्या पॅनलचा मात्र सुफडा साफ झालेला दिसून आला.

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मागील वेळी पेक्षा यंदा ३ हजार मतांची घट पाहायला मिळाली होती. या तीन हजार मतांचा फटका कोणाला बसतो याकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु निवडणुकांमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गटाने माघार घेतल्यामुळे या दोघांच्या मतांची साथ कोणाला मिळते यावर बराचसा निकाल अवलंबून राहणार होता. त्यामध्ये जगताप गटाने उघडपणे नारायण पाटील यांना साथ दिली तर बागल गटाने पाटील यांना छुपी मदत केलेली दिसून आली. यामुळे पाटील यांना मताधिक्य मिळवणे सोपे झाले. या निवडणुकीत एक हाती विजय मिळवत २१ च्या २१ जागांवर पाटील यांनी विजय मिळवला आहे.

politics

शिंदे गटाच्या मतात वाढ …
मागील वेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चौरंगी लढत झाली होती. यामध्ये शिंदे गटाने ४ हजार मतांपर्यंत मजल मारली होती. यंदाच्या निवडणुकीत दुरंगी लढत असल्याने समोरासमोर लढत झाली. यामध्ये शिंदे गटाला 7 हजार मतांपर्यंत जाता आले. यामुळे मागील मतांमध्ये वाढ होत शिंदे गट तीन हजार मतांनी पुढे सरकलेला दिसून आला. यामुळे जरी पराभव झाला असला तरी यंदाच्या निवडणुकीत मतांमध्ये झालेली वाढ ही शिंदे गटासाठी जमेची बाजू म्हणता येईल.

बागल व जगताप किंगमेकर …
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सुरुवातीलाच पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तर बागल गटांनीही पाटील गटाच्या बाजूनी छुपी मदत केल्याचे दिसून आले. यामुळे मागील वेळी पेक्षा पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झालेली दिसून आली. याशिवाय संपूर्ण पॅनल एकतर्फी विजय मिळवत पाटील गटाने गड राखला. बागल व जगताप यांनी या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावल्याचे दिसून आले.

सदरच्या निवडणूकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अमोल भोसले यांनी तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी काम पाहिले.

सालसे गट –
वसंत अंबारे ८४७९, रविकिरण फुके ८२३२, दशरथ हजारे ७९३३ (विजयी)
पराभूत – नागनाथ चिवटे ७०३९, नवनाथ जगदाळे ६८०४, विलास जगदाळे ६८०५,

पोमलवाडी-
विजयी – किरण कवडे ८५७१, नवनाथ झोळ ८३४३, संतोष पाटील ८३२८,
पराभूत – बबन जाधव ६८३७, दशरथ पाटील ६७०१, नितीनराजे भोसले ६७०८,

केम
विजयी – दत्तात्रय देशमुख ८६२५, विजय नवले ८१०६, महेंद्र पाटील ८३३७,
पराभूत – सोमनाथ देशमुख ६७२८, सोमनाथ रोकडे ६७७९, संजयमामा शिंदे ७०६०,

रावगाव
विजयी – अमोल घाडगे ८५७५, देवानंद बागल ८०९२, राहुल सावंत ८०३६,
पराभूत- आशिष गायकवाड ६८४८, विनय ननवरे ६६५४, अभिजीत जाधव ७०५३,

जेऊर
विजयी – दत्तात्रय गव्हाणे ८६०७, श्रीमान चौधरी ८०६१, महादेव पोरे ८१९५,
पराभुत- प्रशांत पाटील ६८९७, प्रमोद बदे ६८११, चंद्रकांत सरडे ६८४६,

संस्था मतदार संघ –
हरिदास केवारे २०९ (विजयी ) सुजित बागल १२७ (पराभूत)

अनुसूचित जाती जमाती
राजेंद्र कदम ८८०६ (विजयी), बाळकृष्ण सोनवणे ७२२६ (पराभूत) ,

भटक्या विमुक्त जाती जमाती
नारायण पाटील ९४६२(विजयी), अनिल केकान ६८७९(पराभूत),

महिला राखीव
विजयी- राधिका तळेकर ८५३७, उर्मिला सरडे ८३८३,
पराभूर – शालन गुंडगिरे ७०७३, मंदा सरडे ६८७४,

इतर मागास
दादासाहेब पाटील ९१२९ (विजयी), रोहिदास माळी ७१४६ (पराभूत).

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE