करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मा आमदार श्री नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप

करमाळा समाचार

करमाळा तालुक्याचे मा आमदार श्री नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांबेवाडी श्री नारायण आबा पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप व शाळेच्या आवारामध्ये वृक्षरोपण बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री अण्णासाहेब सुपनवर यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

पांडे ग्रामपंचायतचे उपसरपंचपाटील गटाचे युवा नेते श्री आदिनाथ उर्फ भैया शिंदे, उद्योगपती श्री नाथाभाऊ नरूटे, सीनामाई उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री तात्यासाहेब शिंदे, युवा नेते श्री बबलू कोळेकर, श्री चकोर नरूटे, अमोल वायकुळे, गोरख हाके, पिनू कोळेकर, सुशील नरूटे, ग्रामपंचायत सदस्य रुपेश लांडगे, नवनाथ शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट पाटील, सहशिक्षिका गायकवाड मॅडम उपस्थित होते.

यावेळी आदिनाथ शिंदे म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्री नारायण आबा पाटील विजय झाले तेव्हा विकास काय असतो ते त्यांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिला. 23 वर्ष दहिगाव उपसा सिंचन योजना रखडली होती ती त्यांनी पाठपुरावा करून तालुक्यातील पूर्व भागातील साडेदहा हजार हेक्टर जमीन ओलीता खाली आणली. कुकडी कॅनल द्वारे वीस वेळा आवर्तने आणली. करमाळा तालुक्यामध्ये रोडची कामे भरपूर केली. करमाळा बस स्टॅन्ड ला जेऊर बस स्थानकाला निधी उपलब्ध केला.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी नारायण आबा पाटील यांनी प्रयत्न केले व त्यांना त्यात यश आले. रिटेवाडी उपसा सिंचन या योजनेचा पाठपुरावा चालू केला आहे. त्याला यश नक्कीच मिळेल. नारायण आबा पाटील यांच्याशिवाय कोणीही करमाळा तालुक्याचा विकास करू शकत नाही. करमाळा तालुक्यातील जनतेने त्यांना अपक्ष असताना सुद्धा भरभरून मतदान केले अशा या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप व खाऊ वाटप वृक्षरोपण करून साजरा करण्याचा आम्हाला योग आला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE