नव्या उपक्रमासाठी दानशुर व हितचिंतकांनी समोर यावे – गटविकास अधिकारी राऊत
करमाळा समाचार
करमाळा पंचायत समीतीच्या वतीने सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये वैज्ञानिकांची जयंती साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होणार आहे. मूलभूत विज्ञानासारख्या महत्वाच्या विषयात आपल्या देशात पूर्वीपासूनच म्हणावे तसे संशोधन झालेले नाही. इतर देशातील संशोधनाच्या उसन्या तांत्रिक ज्ञानावर भारत नवोपक्रम राबवित असतो परिणामी जगभरातील देश भारताकडे फक्त लेबर हब म्हणून पाहतात.

भविष्यात अशीच परिस्थिती राहू नये म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात मूलभूत विज्ञानाबाबत जिज्ञासा प्राथमिक शिक्षणापासून निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी आपण प्रत्येक शाळेत science wall तयार करत करण्याचा मानस पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी बोलुन दाखवला आहे.

याबाबत त्यांनी आवाहन करताना म्हणाले की, करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या शाळेसाठी अशी science wall तयार करणे कामी सढळ हाताने मदत करावी. यासाठी फ्रेम केलेले 28 फोटो आवश्यक आहेत. आपलं आपल्या परीने शक्य असेल त्याप्रमाणे फोटो फ्रेम/रोख स्वरूपात मदत शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे मदत करावी ही विनंती.