करमाळासामाजिकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात उद्या ऐतिहासिक विजय शौर्य दिन कार्यक्रमाचे नियोजन

करमाळा समाचार

विश्वभूषण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, करमाळा यांचे वतीने 1 जानेवारी 2026 रोजी 208 वा. “ऐतिहासिक विजय शौर्य दिन कार्यक्रम सोहळा” संपन्न करण्यात येणार आहे.

विश्वभूषण: डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक-करमाळा. या स्मारकामध्ये “भिमा कोरेगाव येथील विजय शौर्य दिन स्तंभाची” संपुर्ण भारतीय तिरंगा मध्ये प्रतीकृती देखावा, व प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि 500 महार सैनिकांचा महापराक्रमी योध्दा: सिद्धनाक महार यांचा ही शौर्य विजय स्तंभासहीत देखावा.

तसेच,संपूर्ण स्मारकाचे विविध रंगीबेरंगी कृत्रिम पुष्पांचा डेकोरेशनचाही देखावा तयार करण्यात आला आहे. आयोजक व अभिवादक विश्वभूषण: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बहुउद्देशीय सामाजिक संस्था- रजि.करमाळा.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE