करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

विहिर खोदताना दगड कोसळुन झालेल्या अपघातात एक ठार ; विहिर मालकावर गुन्हा दाखल

करमाळा समाचार

तालुक्यातील केम येथे विहिर खोदायचे काम सुरू असताना दरड कोसळून झालेल्या अपघातात परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ज्या शेतकऱ्याच्या शेतात काम केले जात होते त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात संजय पाल वय 23 या जेसीबी ऑपरेटरने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ऑपरेटर बालाजी महादेव शेलार, रा. कव्हे, ता. माढा यांच्या जे.सी.बी. मशीनवर काम करतो.

सदर प्रकरणांमध्ये प्रियांशु केशन पाल, वयः 19 वर्षे, रा. सदमपुर खाबर, ता. दात्तौली, जि. फतेहपूर, राज्यः उत्तर प्रदेश हा ही विहीर खोदण्याचे कामावर मजुरी करतो त्याचा मृत्यु झाला आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की. केम, ता. करमाळा येथील भैरु एकनाथ म्हेत्रे यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्याचे काम चालु होते. त्यावेळी प्रियांशु केशन पाल हा सदर ठिकाणी विहीरीचे मालक भैरु एकनाथ म्हेत्रे यांच्याकडुन मजुरी घेवुन कामावर ठेवले होते. त्यावेळी त्यांनी मजुरांच्या सुरक्षीततेकरीता कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती अशी तक्रार केली आहे.

दि. 19/12/2025 रोजी सकाळी 07:00 वा. चे सुमारास भैरु एकनाथ म्हेत्रे यांच्या शेतातील विहीर खोदण्याचे काम चालु केले. चालक जे.सी.बी. द्वारे खोदकाम करुन चालवित असलेला जे.सी.बी. विहीरीपासुन काही अंतरावर उभा केला. त्यानंतर मजुरांनी विहीरीतील माती व दगड बाहेर काढण्याचे काम चालु केले. त्यावेळी प्रियांशु केशन पाल हा विहीरीमध्ये माती व दगड भरुन देत होता. सकाळी 09:00 वा. चे सुमारास अचानक विहीरीतील दरड कोसळल्याने ती प्रियांशु केशन पाल याच्या अंगावर पडुन तो दरडीच्या माती व दगडाखाली दबला.

त्यानंतर लगेच सर्वानी खाली उतरुन प्रियांशु याच्या अंगावरील माती व दगड बाजुला काढुन त्यास बाहेर काढले. त्यावेळी तो बेशुध्द अवस्थेत होता. त्यांच्या तोंडावर व इतर ठिकाणी जखमा झालेल्या होत्या. त्यानंतर त्यास अॅम्ब्युलन्समधुन ग्रामीण रुग्णलय, कुडूवाडी येथे घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी प्रियांशु पाल यास तपासुन तो मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी प्रियांशु पाल यांच्या प्रेतावर व पंचनामा करुन तसेच डॉक्टरांकडुन पी.एम. करुन घेवुन त्याचे प्रेत अंत्यविधीकरीता ताब्यात दिले. त्यानंतर आम्ही प्रियांशु पाल याचे प्रेत त्याचे मुळगावी नेवुन त्याच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले आहेत.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE