“एक पद एक झाड” उपक्रमातून राजुरीत वृक्षारोपण
करमाळा – संजय साखरे
आज राजुरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात “एक पद एक झाडं” याउपक्रमातून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला, आज गावातील सर्वं पदाधिकारी यांनी मिळून मोरपंखी, ब्लॅकफायकस, चिंच, पिंपळ, सीताफळ, पेरू, जांभूळ अशी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली, शाळेतील शिक्षकांनी सर्वं रोपे जगवण्याची जबाबदारी घेतली.

ग्लोबल वार्मिंग चा विचार करता वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या काळात पाणी फौंडेशन च्या मार्गदर्शनानुसार राजुरीत लोकसहभागातून व सामाजिक पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून मियावाकी पद्धतीने जैववीविधतेनेनटलेले जंगल उभारण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने घेतला.

यावेळी सरपंच डॉ अमोल दुरंदे, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, मुख्याध्यापक मोरे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दुरंदे, गणेश जाधव,कैलास साखरे, संजय जगताप, दत्तात्रय गरुड, नामदेव जाधव, गोकुळ साखरे, मनोज दुरंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या.